ब्रेकअप नंतरीही या अभिनेत्रींने केले आपल्या एक्...

ब्रेकअप नंतरीही या अभिनेत्रींने केले आपल्या एक्ससोबत काम (From Kareena To Katrina And Deepika, After The Breakup, They Worked In Films With Their Ex)

बॉलिवूड स्टार्सच्या अफेअर आणि ब्रेकअपच्या बातम्या मीडियामध्ये सतत चर्चेत असतात. कुणाची प्रेमकहाणी जाणून चाहते दंग असतात, तर कुणाचा ब्रेकअप लोकांना आश्चर्याचा धक्का देत असतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी ब्रेकअपनंतर आपल्या एक्ससोबत चित्रपटांमध्ये काम करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्या अभिनेत्रींच्या यादीत दीपिका पदुकोण, करीना कपूर खान आणि कतरीना कैफ यांसारख्या अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे.

करीना कपूर खान

 नवाब घराण्याची सून आणि सैफ अली खानची पत्नी, करीना कपूर खान ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. एकेकाळी अभिनेता शाहिद कपूरसोबतच्या नात्यामुळे ती बरीच चर्चेत होती. चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते, मात्र काही कारणास्तव दोघांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर दोघांनी ‘उडता पंजाब’ या चित्रपटात एकत्र काम केले होते, त्यांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता.

कतरीना कैफ

 बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अफेअरच्या संदर्भात ज्या कलाकारांची नावं सर्वाधिक चर्चेत होती त्यांच्या नावांमध्ये कतरीना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या नावाचाही समावेश आहे. दोघांच्या अफेअरच्या बातम्या नेहमीच चर्चेत होत्या. पण काही कारणास्तव त्यांचेही ब्रेकअप झाले आणि त्यांचे मार्ग कायमचे वेगळे झाले. मात्र, ब्रेकअपनंतर दोघांनी ‘जग्गा जासूस’ चित्रपटात एकत्र काम केले.

श्रद्धा कपूर

 एकेकाळी अभिनेत्री श्रद्धा कपूरचे नाव आदित्य रॉय कपूरसोबत जोडले जात होते. मात्र काही काळानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येऊ लागल्या. या सगळ्यानंतरही दोघांनी ‘ओके जानू’ चित्रपटात एकत्र काम केले होते. या दोघांनी कधीही त्यांच्या अफेअरबद्दल किंवा ब्रेकअपबद्दल उघडपणे सांगितले नाही.

प्रियांका चोप्रा

 देसी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली प्रियांका चोप्रा आजच्या काळात ग्लोबल आयकॉन म्हणून ओळखली जाते. सध्या ती निक जोनाससोबत सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा प्रियांका आणि शाहिद कपूरच्या अफेअरच्या बातम्या बी टाऊनमध्ये चर्चेत होत्या. पण नंतर काही कारणाने दोघांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर दोघेही ‘तेरी मेरी कहानी’ चित्रपटात एकत्र दिसले होते.

अनुष्का शर्मा

 रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा यांच्या अफेअरच्या बातम्याही खूप रंगल्या होत्या. या दोघांनीही यावर कधीच काही सांगितले नाही. नंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येऊ लागल्या. या सगळ्यानंतर अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंहने ‘दिल धडकने दो’ चित्रपटात एकत्र दिसले होते.

दीपिका पदुकोण

 रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांचे अफेअरही बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक चर्चेत होते. पण जेव्हा त्यांचे ब्रेकअप झाले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. या दोघांच्या ब्रेकअपची कोणालाच अपेक्षा नव्हती. मात्र, ब्रेकअपनंतर दोघेही ‘ये जवानी ये दीवानी’ आणि ‘तमाशा’ सारख्या चित्रपटात एकत्र काम केले.