करीना कपूर ते रणवीर सिंह, रणबीर कपूरपर्यंत, बॉल...

करीना कपूर ते रणवीर सिंह, रणबीर कपूरपर्यंत, बॉलिवूडच्या या कलाकारांना होळी खेळायला आवडत नाही (From Kareena Kapoor To Ranveer Singh And Ranbir Kapoor, These Bollywood Stars Don’t Celebrate Holi)

खरं तर बरेचसे बॉलिवूड स्टार्स त्यांच्या घरी होळीचा सण मोठ्या धामधुमीत साजरा करताना दिसतात. परंतु काही स्टार्स असेही आहेत की ज्यांना होळी खेळायला अजिबातच आवडत नाही, ही मंडळी रंगांपासून दूर राहणेच पसंत करतात. पाहुयात यात कोणत्या कलाकारांचा समावेश आहे.

करीना कपूर

करीना कपूरने आजोबा राज कपूर यांच्या निधनानंतर होळी खेळायचेच सोडून दिले. एके काळी संपूर्ण चित्रपटसृष्टीला राज कपूर यांच्याकडील होळीची प्रतिक्षा असायची. ते त्यांच्या घरी मोठ्या धामधूमीत होळी साजरी करत. परंतु राज कपूर गेल्यानंतर कपूर खानदानातील त्या होळीची मजाच निघून गेली. म्हणूनच कदाचित करीनाने देखील होळी खेळणं सोडलं असावं.

रणबीर कपूर

कपूर खानदानातील लाडका लेक आणि नातू रणबीर कपूर चित्रपटात ‘बलम पिचकारी.. ‘ गाण्यावर थिरकत होळीचा मस्त आनंद घेताना दिसत असला तरी वास्तवात मात्र त्याला होळी खेळणे अजिबातच आवडत नाही. कपूर परिवाराच्या होळीच्या समारंभामध्येही तो कधी दिसला नाही. त्याला रंगांची ॲलर्जी आहे, असे म्हणतात. कारण बलम पिचकारी या गाण्याचं शूटिंग करताना त्याची अतिशय वाईट परिस्थिती झाली होती.

तापसी पन्नू

तापसीच्या आई-वडिलांना होळी खेळायला आवडत नसल्याने लहानपणापासूनच तापसी कधी होळी खेळली नाही आणि आता तिच्या व्यस्त शेड्युलमुळे तिला होळी खेळता येत नाही.

रणवीर सिंह

रणवीर सिंहने देखील पडद्यावर चित्रपटातून होळी साजरी केली असली तरी खऱ्या जीवनात मात्र तो रंगांपासून दूरच राहतो. आपल्या चेहऱ्यावर कोणीही केमिकल असलेले रंग लावणे, हे त्याला बिलकूल आवडत नाही. म्हणूनच त्याला होळी खेळणं पसंत नाही.

टायगर श्रॉफ

होळीच्या दिवशी पाण्याचा होणारा अपव्यय टायगर श्रॉफला पसंत नाही. याशिवाय केमिकलयुक्त रंग वापरण्याची त्याला भिती वाटते. म्हणून तो होळी खेळण्याचे टाळतो.

जॅकलीन फर्नांडिस

जॅकलीन फर्नांडिस श्रीलंकेत राहणारी आहे. तरी तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपली व्यवस्थित ओळख निर्माण केली आहे. हळूहळू तिने भारतीय रीतीरिवाज स्वीकारले आहेत. परंतु होळीबाबत तिला फारसा उत्साह दिसत नाही. अनेक वर्षे भारतात राहूनही जॅकलीन अजूनही होळी खेळलेली नाही.

जॉन अब्राहम

होळी खेळताना लावण्यात येणाऱ्या रंगामुळे त्वचेला नुकसान होतं आणि होळीचे रंग लावण्याच्या बहाण्याने महिलांसोबत गैरव्यवहार केला जातो, या दोन कारणांमुळे जॉनला होळी साजरी करणं आवडत नाही. तो या सेलिब्रेशनपासून चार हात लांब राहणंच पसंत करतो.

श्रुति हसन

कमल हसनच्या लेकीला श्रुतिला तिच्या त्वचेची काळजी वाटते तसेच पाणी फुकट घालवणे तिला आवडत नाही म्हणून ती हा रंगांचा खेळ खेळत नाही.