करीना कपूर ते दीपिका पादुकोण : या आहेत बॉलिवूडच...

करीना कपूर ते दीपिका पादुकोण : या आहेत बॉलिवूडच्या टॉप नणंद-भावजया (From Kareena Kapoor To Deepika Padukone : These Are The Top 5 Sister-In-Law Of Film Industry)

बॉलिवूडमधील कलाकारांची रिश्तेदारी पूर्वापाड चालत आली आहे. पण आत्ताच्या या काही तरुण कलावती नणंद-भावजया आहेत आणि त्यांचं नातं चांगल्या दोस्तीचं आहे. ह्या बघा टॉपच्या ५ नणंद – भावजया :

करीना कपूर – सोहा अली खान

करीना कपूर बोल्ड आणि बिनधास्त आहे खरी, पण आपल्या कुटुंबातील नाती ती व्यवस्थित सांभाळून आहे. तिची नणंद आहे सोहा अली खान. या नणंदेशी तिचा चांगला दोस्ताना आहे. अन्‌ सोहाचं पण आपल्या करीना भाभीवर उत्कट प्रेम आहे.

दीपिका पादुकोण – रितिका

दीपिका आणि रणवीर सिंह यांचे संबंध जितके मधुर आहेत, तितकेच मधुर संबंध दीपिका आणि रणवीरची बहीण – म्हणजेच नणंद रितिकाचे आहेत. कित्येक खास प्रसंगी या नणंद – भावजया एकत्र दिसतात आणि त्यांची जवळीक देखील दिसून येते.

ऐश्वर्या राय बच्चन – श्वेता नंदा

ऐश्वर्या राय बच्चन दिसायला सौंदर्यसंपन्न आहे आणि आपल्या कुटुंबातील संबंध ती अशीच छान जपते. तिचे नणंद श्वेता नंदाशी खूप चांगले बॉन्डिन्ग आहे. अन्‌ श्वेता देखील आपल्या भावजयीच्या पालकत्त्वाची खूप तारीफ करत असते. श्वेता सांगते की, ऐश्वर्या, आराध्याला चांगली जपते. त्यामुळे लहान वयातच आराध्या खूप शहाणी झाली आहे.

काजोल देवगण – नीलम

काजोलचे, तिची नणंद नीलमशी खूप प्रेमळ संबंध आहेत. दोघी नेहमीच एकत्र असतात. आणि एकमेकींचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असतात.

राणी मुखर्जी – ज्योती

राणी मुखर्जी, आपल्या वहिनीशी – ज्योतीशी खूप प्रेमाने वागते. लग्नाआधी राणी आपल्या घरातील लोकांना खूप चांगली सांभाळत होती. अन्‌ लग्नानंतर देखील तिचे ज्योती वहिनीशी खूप चांगले जमते. आपल्या या ज्योती वहिनीसोबत राणी, घरगुती समारंभात आणि दुर्गा पुजेला सलोख्याने वागताना दिसते.