या टीव्ही कलाकारांच्या मनात आले होते आत्महत्येच...

या टीव्ही कलाकारांच्या मनात आले होते आत्महत्येचे विचार (From Kapil Sharma to Jasmin Bhasin, When These TV Stars Thought of Suicide)

पडद्यावर प्रसिद्ध टीव्ही कलाकारांची अलिशान जीवनशैली पाहिल्यानंतर आपलंही आयुष्य त्यांच्यासारखंच असावं अशी प्रत्येकाची इचछा असते. परंतू दिसतं तसं नसतं… प्रत्येक कलाकारांचे पडद्यावरील जीवन आणि खऱ्या आयुष्यातील जीवन यात बरीच तफावत असते. अनेक कलाकारांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातून बऱ्याच अडचणीतून जावे लागते. इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी काम मिळत नसल्यामुळे, तसेच इतर वैयक्तिक समस्यांमुळे आत्महत्येचा विचार केला होता.  

कपिल शर्मा

‘द कपिल शर्मा शो’च्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवणारा कॉमेडी किंग कपिल शर्माच्या आयुष्यात एक असा टप्पा आला होता, जेव्हा त्याच्या मनात आत्महत्येचे विचार फिरत होते. नकारात्मक प्रसिद्धीमुळे कपिल नैराश्येत गेला होता आणि त्यानंतर अनेकदा त्याने समुद्रात उडी मारून जीव देण्याचा विचारही केला होता.

जैस्मिन भसीन

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री जैस्मिन भसीननेही एकदा आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. असे म्हटले जाते की तिच्या करिअरमधील चढउतारामुळे अभिनेत्रीला खूप त्रास होत होता. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, ती अनेकदा ऑडिशनमध्ये अपयशी ठरली, याला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचाही विचार केला.

शहनाज गिल

सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची घट्ट मैत्री सर्वांनाच माहित आहे, पण सिद्धार्थच्या अचानक झालेल्या निधनाने शहनाज पूर्णपणे खचून गेली होती. तिची जगायची इच्छाच नाहीशी झाली. त्यावेळी तिला नैराश्याने ग्रासले होते. तिच्या मनात आत्महत्येसारखे विचार येऊ लागले.

अर्चना गौतम

‘बिग बॉस 16’ मध्ये दिसलेली अर्चना गौतमने एका मुलाखतीत सांगितले की, कोविडच्या काळात तिच्याकडे भाडे भरण्यासाठीही पैसे नव्हते. आर्थिक त्रासाला कंटाळून ती आत्महत्या करण्यासाठी बाल्कनीत उभी राहिली पण आईचा विचार येताच तिने आत्महत्येचा विचार मनातून काढून टाकला.

मृणाल ठाकूर

अभिनेत्री मृणाल ठाकूरने एकदा सांगितले की, काम आणि जबाबदाऱ्यांमुळे आपल्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले होते. अभिनेत्रीला वाटले होते की वयाच्या 23 व्या वर्षी तिचे लग्न होईल आणि नंतर मुले होतील. या विचारामुळे अनेकवेळा तिने रेल्वेतून किंवा इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.

रुबीना दिलैक

अभिनेत्री रुबिना दिलैकच्या आयुष्यात एक काळ असा आला होता जेव्हा तिला तिचं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य सांभाळता येत नव्हतं. अनेक समस्यांमुळे अभिनेत्री डिप्रेशनमध्ये आली होती. तेव्हा तिच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येऊ लागला.

उर्फी जावेद

आपल्या विचित्र फॅशन आणि स्टाइलमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फी जावेदलाही तिच्या आयुष्यात वाईट प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. अभिनेत्री आपल्या अयशस्वी कारकीर्द आणि नातेसंबंधांमुळे खूप नाराज होती. जेव्हा उर्फीकडे पैसे नव्हते आणि ती स्वत:ला आयुष्यात हरल्यासारखी समजू लागली तेव्हा तिच्या मनात आत्महत्येचे विचार वारंवार येऊ लागले.