वक्षस्थळं वाढविलेल्या ७ नट्या (From Kangana- Sh...

वक्षस्थळं वाढविलेल्या ७ नट्या (From Kangana- Shilpa to Bipasha- Shreedevi; these 7 Bollywood actresses have undergone breast enlargement surgery)

बॉलिवूडमध्ये अशा काही नट्या आहेत की ज्यांना आपल्या अभिनय गुणांपेक्षा देहप्रदर्शनाची
जास्त आस आहे. आपण अभिनेत्री म्हणून नाव कमावण्यापेक्षा हॉट अ‍ॅन्ड सेक्सी गर्ल म्हणून
नावारूपास यावं अशी त्यांची महत्त्वाकांक्षा असते. त्यासाठी त्या जंग जंग पछाडताना दिसतात.
चेहर्‍याचा आकार नीट होण्यासाठी लिप फिलींग अर्थात ओठांची ठेवण नीट करणे किंवा नोज्
जॉब अर्थात बसक्या किंवा विचित्र आकार असलेल्या नाकाला चाफेकळीचा आकार देणे, यासाठी
त्यांनी प्लास्टीक सर्जरी केलेल्या आहेत. इतकंच नव्हे तर देहसौंदर्य खुलवण्यासाठी ब्रेस्ट इम्प्लांट
म्हणजेच छातीचे आकार वाढविण्यासाठी देखील काही तरुण नट्यांनी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत.
सर्जरी करून आपले उरोज ठसठशीत केलेले आहेत. सेक्सी फिगरसाठी देहाचा हा आटापिटा
करणार्‍या ७ नट्या अशा आहेत.

कंगना रणौतः सुशांत सिंह राजपूत ते अंमली पदार्थांच्या बॉलिवूड सिताऱ्यांमध्ये वापर ते महाराष्ट्र
सरकार विरोधात आव्हानात्मक भूमिका घेणारी कंगना रणौत सध्या चांगलीच चर्चेत आहे.
‘गँगस्टर’ या चित्रपटाद्वारे तिने पदार्पण केले. तेव्हा तिचं देहसौंदर्य काही नजरेत भरण्यासारखं
नव्हतं. ती एकप्रकारे सपाट आणि सडपातळ दिसली होती. पण नंतर ‘रास्कल’ या चित्रपटात मात्र
तिच्या देहाने आकर्षक आकार घेतल्याचे पाहून प्रेक्षकांना नवल वाटले होते. याचे रहस्य नंतर
उलगडले. कंगनाने शस्त्रक्रिया करून आपला उरोभाग फुगविला असल्याची माहिती उघड झाली.

शिल्पा शेट्टीः आपल्या सडसडीत बांध्यासाठी शिल्पा प्रसिद्ध आहे. लग्न आणि मूल होऊन
सुद्धा तिनं आपली फिगर चांगली राखली आहे. मात्र तिचं हे देहसौंदर्य नैसर्गिक नसून वैद्यकीय
आहे. कारण तिनं आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच आपल्या अपऱ्या नाकावर शस्त्रक्रिया करून
ते आकारात आणलं आहे. शिवाय वक्षस्थळांचा फुगीरपणा देखील ब्रेस्ट इम्प्लाट सर्जरीच्या
साहाय्यानेच मिळविला आहे. ही गोष्ट तिनं उघडपणे जाहीर केलेली नसली तरी तिचे आधीचे
आणि नंतरचे फोटो पाहिले तर हे सहजपणे लक्षात येते.

बिपाशा बासुः रंगाने सावळी असूनही आपल्या सेक्सी व हॉट अंगकाठीने बिपाशाने बॉलिवूडमध्ये
स्थान मिळविले. तिचा कमनीय बांधा प्रेक्षकांना आकर्षित करत होता. दिसायला सर्वसाधारण होती
तरी ती इथे यशस्वी झाली. याचं रहस्य ब्रेस्ट इम्प्लान्ट सर्जरीत दडलेलं आहे. आधी ती मॉडेलिंग
क्षेत्रात सुपर मॉडेल होती. तिथेच आपले पाय रोवण्यासाठी तिने आपल्या छातीचे ऑपरेशन करून
घेत ती आकर्षक व मादक बनवली होती. रुपेरी पडद्यावर चमकल्यानंतर आपल्या या मादक
सौंदर्याचे प्रदर्शन करण्याची एकही संधी तिनं दवडली नाही.

श्रीदेवीः आपला चेहरा आणि देहाचे सौंदर्य खुलविण्यासाठी प्लास्टीक सर्जरीचा सहारा घेणारी
श्रीदेवी ही बहुधा पहिलीच अभिनेत्री होती. कारण ती मुळातच दाक्षिणात्य चित्रपटातून आली. तिथे
तिचं सौंदर्य सोज्वळच दिसलं होतं. तरी पण आपला चेहरा व वक्षस्थळांमध्ये तिला काहीतरी
उणीव दिसली असावी. म्हणून प्लास्टीक सर्जरी करून ओठ व नाकाचा आकार बदलून घेतला.
अन् देह कमनीय होण्यासाठी उरोभागावरपण शस्त्रक्रिया करून घेतली. या शस्त्रक्रियांची कमाल
म्हणजे वयाच्या पन्नाशीनंतर देखील ती चांगलीच तरुण दिसत होती व तरुण नट्यांशी स्पर्धा
करत होती.

सुश्मिता सेनः १९९४ साली झालेल्या सौंदर्य स्पर्धेत सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्स हा किताब
मिळविला. तेव्हा तिचं नैसर्गिक रूप खुलून आलं होतं. पुढे ती मॉडेल म्हणून कामं करू लागली
तेव्हा तिच्या या रूपाची खूप तारीफ झाली होती. मग तिला चित्रपटसृष्टीत संधी मिळाली. इथे
वावरायला लागल्यावर तिला जाणवलं की, आपल्या देहसौंदर्यात टॉपच्या नट्यांच्या मानाने काही
उणीव आहे. तेव्हा तिने उरोजांवर शस्त्रक्रिया करून घेतली. या ब्रेस्ट इम्प्लान्टमुळे तिचे
शरीरसौष्ठव अधिक उठून दिसू लागलं नि ते ती अभिमानाने मिरवू लागली.

आयेशा ताकियाः ही नटी चित्रपटातील भूमिकांपेक्षा तिनं केलेल्या कॉस्मेटिक सर्जरीज्‌बद्दल
चर्चेत राहिली आहे. काही महिन्यांपूर्वी तिने ओठांवर सर्जरी केली नि त्यांना आकर्षक आकार
दिला. या आधी तिनं आपल्या छातीवर हाच प्रयोग केला नि उरोभाग अधिक उठावदार केला
आणि नाकाला देखील सर्जरीद्वारे नेटका आकार दिला होता. मात्र गंमतीची गोष्ट अशी की,
आपल्या उरोभागाच्या शस्त्रक्रियेबद्दल तिने इन्कार केलेला आहे.

राखी सावंतः विवादास्पद विधानं आणि अधिक उठावदार वक्षस्थळं याबाबत राखी सदैव चर्चेत
राहते. एका मुलाखतीमध्ये तिने छातीचा आकार फुगीर करण्यासाठी ब्रेस्ट इम्प्लान्ट केल्याची
जाहीर कबुली दिली होती. अन् ही सर्जरी कित्येक नट्या करतात. त्यात विशेष असं काही नाही,
अशी पुष्टीदेखील जोडली होती. नंतर मात्र आपल्या छातीचा हा भार सहन होईनासा झाला म्हणा
किंवा आवडेनासा झाला म्हणा; राखीनं पुन्हा त्यावर शस्त्रक्रिया करून हा आकार मापात आणला.