कंगना रनौत ते करीना, अमिताभ बच्चन – सर्व ...

कंगना रनौत ते करीना, अमिताभ बच्चन – सर्व बॉलिवूड कलाकारांनी दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा! (From Kangana Ranaut, kareena To Amitabh Bachchan- These Bollywood Stars Wish Fans Happy Dussehra)

आज सगळीकडे दसरा आनंदाने साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कंगना रणौत

आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कंगना रणौतने एक खास पोस्ट शेअर केली आहे. ‘जीत हमेशा अच्छाई की होती है’, असा संदेश देऊन तिनं शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन

आपल्या ट्वीटवर महानायक अमिताभ बच्चन म्हणतात – हॅप्पी दशहरा!

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टीने एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात ती म्हणते – आपल्या सर्वांना दुर्गा देवीचे आशीर्वाद मिळत राहोत, अन्‌ आपल्या सर्व इच्छा पूर्ण करोत.

अभिषेक बच्चन

ज्यूनिअर बच्चन अभिषेकचे ट्वीटर वर लिहिले – प्रेम, शांती, व आनंदाबरोबरच आपल्या जीवनात नेहमीच सत्याचा विजय होवो.

करीना कपूर

करीनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ पोस्ट केला व लिहिले – हॅपी दशहरा!

मनोज वाजपेयी

मनोजने ट्वीटरवर पोस्ट शेअर केली. त्यात म्हटलंय्‌ – दशहरा की शुभकामनाएं.