चित्रपटात यश मिळताच या स्टारकिड्सनी खरेदी केले ...

चित्रपटात यश मिळताच या स्टारकिड्सनी खरेदी केले स्वत:चे घर (From Janhvi Kapoor to Alia Bhatt, These Star Kids bought Their Home After Getting Success in Films)

सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांची मुले आता इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. स्टारकिड्सना इंडस्ट्रीत पाऊल ठेवणे भलेही सोपे असले तरी यश मिळवण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागतात. चित्रपटांमध्ये नाव आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर अनेक स्टार किड्सनी स्वतःचे घरही घेतले आहे.

जान्हवी कपूर

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतेच वांद्रे येथील एका पॉश भागात आपल्या स्वप्नातील घर विकत घेतले आहे. जान्हवीच्या या घराची किंमत 65 कोटी रुपये आहे. अभिनेत्रीने पहिले घर विकल्यानंतर हे दुसरे घर खरेदी केले.

आलिया भट्ट

आलिया भट्टने आपल्या फिल्मी करीअरची सुरुवात ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून केली. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. आलिया भट्टने चित्रपटसृष्टीत यश मिळाल्यानंतर स्वतःचे घर देखील विकत घेतले, त्या घरात ती लग्नापूर्वी आपली बहीण शाहीन भट्टसोबत राहायची.

रणबीर कपूर

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरनेही इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यानंतर स्वतःचे घर घेतले होते. रणबीरने 2016 मध्ये बॅचलर पॅड विकत घेतल्याचे सांगितले जाते, ते बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानची पत्नी गौरी खानने डिझाइन केले होते. रणबीरच्या बॅचलर पॅडची किंमत 35 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते.

सोनम कपूर

बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांची लाडकी लेक सोनम कपूरने 2015 मध्ये मुंबईत सुमारे 35 कोटी रुपयांचे एक आलिशान घर खरेदी केले होते. 2007 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सोनमची ही पहिली मालमत्ता होती.

टायगर श्रॉफ

जॅकी श्रॉफ यांचा लाडका मुलगा टायगर श्रॉफ अनेक चित्रपटांमध्ये दिसला असून त्याने आपल्या अभिनयामुळे इंडस्ट्रीत एक वेगळे स्थानही मिळवले आहे. चित्रपटांमध्ये यश मिळवल्यानंतर टायगरनेही स्वतःचे वेगळे घर घेतले. त्याने मुंबईतील एका पॉश भागात समुद्राकिनारा असलेल्या ठिकाणी एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे.

अर्जुन कपूर

जान्हवी कपूरचा भाऊ अर्जुन कपूरने ‘इश्कजादे’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. चित्रपटांमध्ये आल्यानंतर अर्जुन कपूरने मुंबईतील एका पॉश भागात एक आलिशान 4 बीएचके फ्लॅटही खरेदी केला होता, त्याची किंमत 20 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.

वरुण धवन

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवनने 2021 मध्ये बालपणीची मैत्रीण नताशा दलालसोबत लग्न केले. मात्र, लग्नापूर्वीच वरुणने स्वत:साठी नवीन घर घेतले होते. वरुण धवनने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या घराची किंमत 20 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते.