हृतिक रोशन, कार्तिक आर्यन, जॉन अब्राहम यांच्यास...

हृतिक रोशन, कार्तिक आर्यन, जॉन अब्राहम यांच्यासह या कलाकारांनी २०२२ मध्ये रुपेरी पडद्यावर गाजवल्या नकारात्मक व्यक्तिरेखा (From Hrithik Roshan, Kartik Aaryan to John Abraham… 6 six actors who played antagonists to perfection in 2022)

नायक म्हणून चित्रपटाच्या पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या काही बॉलिवूड अभिनेत्यांनी आपल्या नकारात्मक व्यक्तिरेखेनेही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. २०२२ मध्ये अनेक कलाकारांनी रुपेरी पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारून वाहवा मिळवली आहे. त्यातलाच एक म्हणजे विक्रम वेधामध्ये गँगस्टरची भूमिका करणारा हृतिक रोशन. आणि कार्तिक आर्यन ज्याने अलीकडेच फ्रेडी चित्रपटातील एका वेगळ्या नकारात्मक व्यक्तिरेखेने चाहत्यांना प्रभावित केले. २०२२ साली रुपेरी पडद्यावर आपल्या नकारात्मक भूमिकेने चाहत्यांना प्रभावित केलेल्या अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेऊया.

हृतिक रोशन – विक्रम वेधा

विक्रम वेधा हा तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये हृतिक एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसला. तामिळमध्ये विजय सेतुपतीने ही भूमिका साकारताना खरोखरच कमाल केली, तिच भूमिका साकारताना हृतिकने पात्रात स्वतःचे बारकावे जोडले आणि  वेधाची भूमिका त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम भूमिका ठरली. हृतिकचा या चित्रपटातील पूर्णपणे डी-ग्लॅम्ड लूकमधील गँगस्टर प्रेक्षकांना खूपच आवडला होता.

कार्तिक आर्यन – फ्रेडी

मुख्यतः खेळकर, मजेदार आणि चुलबुल्या भूमिका साकारण्यासाठी ओळखला जाणारा कार्तिक, फ्रेडी चित्रपटामध्ये  अंतर्मुख करणारा प्रियकर झाला आहे, जो प्रेमासाठी सर्वकाही प्रयत्न करतो. या चित्रपटातील आर्यनचा अभिनय पाहता त्याने नकारात्मक भूमिकेतही  स्वत:ला चपखल बसवले असून प्रेक्षकांनीही त्याची ही भूमिका डोक्यावर घेतली.

जॉन अब्राहम – एक व्हिलन रिटर्न्स

एक व्हिलन रिटर्न्स या चित्रपटामध्ये भैरव (जॉन अब्राहम) या टॅक्सी ड्रायव्हरची कथा दाखवली आहे. भैरव ही एक विचित्र अशा स्वरूपाची व्यक्तिरेखा आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात रसिकावर एकतर्फी केलेल्या प्रेमानंतर वैफल्य आल्याने अशा प्रेमभंग झालेल्या जोडप्यातील प्रेयसींचा तो ‘गेम’ करत असतो. खरं तर जॉन अब्राहमसारखा देखणा टॅक्सी ड्रायव्हर असेल तर त्याचा कोण तिरस्कार करेल. पण मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारण्यात जॉनने कोणतीही कसर सोडली नाही. जॉनची नकारात्मक भूमिका करण्याची ही पहिलीच वेळ नाही, पण तरीही त्याची ही भूमिका नक्कीच कौतुकास्पद आहे.

अपारशक्ती खुराणा – धोका राउंड दी कॉर्नर

दंगलमधला प्रेमळ भाऊ असो किंवा ‘स्त्री’मधला मजेशीर मित्र असो, अपारशक्तीने आपल्या हृदयाच्या अगदी जवळ असणारी आणि सकारात्मक भावना असणारी पात्रे साकारलेली आपण  पाहिले होते. पण धोका राऊंड द कॉर्नर या चित्रपटामध्ये तो एका नकारात्मक पात्राच्या भूमिकेत दिसला होता. यात त्याने एका दहशतवाद्याची भूमिका केली होती आणि या भूमिकेला अनेक चांगले रिव्ह्यू देखील मिळाले.

विजय वर्मा – डार्लिंग्स

डार्लिंग्समध्ये हमजा असू शकतो, परंतु त्याच्याशिवाय बद्रूचे आयुष्य कसे असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि म्हणूनच हमजाला चेहरा देण्याचे संपूर्ण श्रेय विजय वर्मा याला जाते, जो इंडस्ट्रीतील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. या अभिनेत्याने हमजाला केवळ एक पात्र म्हणून अमर केले नाही तर त्याच्या अभिनयाने सर्वांनाच प्रभावित केले. शाहरुख खानने देखील हमजाची भूमिका साकारायला आवडली असती असे म्हटले होते.

सिकंदर खेर – मोनिका ओ माय डार्लिंग

मोनिका ओ माय डार्लिंग ही एक कॉमेडी थ्रिलर फिल्म आहे. यात निशिकांत अधिकारीची भूमिका साकारणारा सिकंदर सुटेड लुकमध्ये देखणा दिसला होता. आर्या 1 आणि 2 या वेब सीरिजमध्ये ग्रे शेडेड व्यक्तिरेखा साकारल्यानंतर, सिकंदरने नकारात्मक पात्र साकारण्याचा वेगळा प्रयत्न केला. अन्‌ त्याचा हा प्रयत्न समीक्षक आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.