हिना खान ते मुनमुन दत्ता : या लोकप्रिय टी. व्ही...

हिना खान ते मुनमुन दत्ता : या लोकप्रिय टी. व्ही. कलाकारांचे शिक्षण किती झालं आहे? (From Hina Khan to Munmun Dutta, Know Educational Qualification of These Famous TV Actresses)

दर्शकांना बॉलिवूडच्या कलाकारांचं जेवढं वेड असतं, तेवढीच आपुलकी सध्या टेलिव्हिजनवरील कलाकार मंडळींच्या बाबतीत दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षात टेलिव्हिजन हे माध्यम अधिक लोकप्रिय ठरलं आहे. त्यामुळेच प्रसिद्धी अन्‌ लोकप्रियतेच्या बाबत टेलिव्हिजनवरील स्टार्स बॉलिवूडच्या स्टार्संना टक्कर देत असल्याचे दिसत आहेत. चित्रपटांतील कलाकारांप्रमाणेच मालिकांमधील कलाकारांच्या जीवनातही काय चालले आहे हे जाणून घेण्यास दर्शक उत्सुक असतात. त्यांचं खाजगी जीवन, नातेसंबंध तसंच आपल्या आवडत्या कलाकारांचं शिक्षण किती झालं आहे, हे देखील त्यांना जाणून घ्यायचं असतं. तर मग हिना खान ते मुनमुन दत्ता पर्यंत काही लोकप्रिय टी. व्ही. कलाकारांचे शिक्षण किती झालं आहे, हे जाणून घेऊया.

हिना खान

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

टी. व्ही. वरील मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खानचं नाव टेलिव्हिजनवरील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मालिकेत अक्षराच्या भूमिकेत दिसणारी हिना तिच्या खऱ्या आयुष्यात अतिशय ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. तिच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल सांगायचं तर तिने गुडगाव येथील एका मॅनेजमेंट स्कूलमधून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतली आहे.  

मुनमुन दत्ता

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

मागील अनेक वर्षे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका सातत्याने दर्शकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत मुनमुन दत्ता बबीताजीचे पात्र साकारत आहे. आता बबीताजी हीच तिची ओळख झाली आहे. तिने इंग्लिश लिटरेचरमध्ये पदवी घेतली आहे.

दिव्यांका त्रिपाठी

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

दिव्यांका त्रिपाठीने भोपाळ येथून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. याशिवाय उत्तरकाशी येथील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगमधून तिने गिर्यारोहणाचा कोर्स केला आहे. दिव्यांकाने भोपाळ रायफल अकादमीमध्ये प्रवेश घेतला, जिथे तिने रायफल शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले. आर्मी ऑफिसर बनण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या दिव्यांकाला अभिनेत्री बनायचे होते, त्यामुळे नशिबाने तिला मुंबईत आणले आणि आज तिचे नाव टेलिव्हिजनच्या सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

शुभांगी अत्रे

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

टी. व्ही. वरील सर्वांच्या परिचयाची अभिनेत्री शुभांगी अत्रे घराघरात अंगूरी भाभी म्हणून ओळखली जाते. ‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेतील अंगूरी भाभीच्या भूमिकेने ती भलतीच लोकप्रिय झाली. शुभांगीने एमबीए केले आहे. तसेच मध्य प्रदेशातील देवी अहिल्या विद्यापीठातून मार्केटींग आणि मानव संसाधन या विषयात तिने पदवी घेतली आहे.

निया शर्मा

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

टी. व्ही. वरील प्रसिद्ध नागीन निया शर्माला कोण ओळखत नाही. आपल्या फॅशन सेन्समुळे निया नेहमीच चर्चेत असते. तिची स्टाईल आणि ग्लॅमरस अदांनी चाहत्यांवर भुरळ घातलेली आहे. दिल्लीला राहणाऱ्या निया शर्माने मास कम्युनिकेशनमध्ये पदवी घेतली आहे. दिल्लीला आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयामध्ये करिअर करण्याच्या उद्देशाने तिने मुंबई गाठली. आज ती या क्षेत्रात बऱ्यापैकी स्थिरावली आहे. उत्तम अभिनेत्री म्हणून ती ओळखली जातेय.