दिव्यांका त्रिपाठीपासून ते मोना सिंहपर्यंतच्या ...

दिव्यांका त्रिपाठीपासून ते मोना सिंहपर्यंतच्या कलाकारांनी नाकारले होते हिट शो (From Divyanka Tripathi to Mona Singh, These TV Stars have Rejected Offers of Hit Shows)

बहुतेक लोक फावल्या वेळेत मनोरंजनासाठी टीव्ही मालिका बघतात. त्यामुळे डेली सोप हा प्रेक्षकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग झाला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशा अनेक टीव्ही मालिका आहेत,ज्या पाहिल्याशिवाय प्रेक्षकांना दिवस अपूर्ण वाटतो.  ‘अनुपमा’ ते ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘गम है किसी के प्यार में’ सारख्या मालिका टीआरपीच्या यादीत अव्वल आहेत. इतकंच नाही तर या मालिकांमधील व्यक्तिरेखाही प्रेक्षकांना खूप आवडतात, पण आज आम्ही तुम्हाला  अशाच टीव्ही कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी हिट शोच्या ऑफर नाकारल्या. या यादीत दिव्यांका त्रिपाठी ते मोना सिंग यांच्या नावांचा समावेश आहे.

दिव्यांका त्रिपाठी

दिव्यांका त्रिपाठीचे नाव टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक मालिकांमधून आपल्या दमदार अभिनयाने दिव्यांका वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. पण दिव्यांकाने एका हिट टीव्ही शोची ऑफर नाकारली होती. ‘बडे अच्छे लगते हैं 2’साठी दिव्यांका त्रिपाठीही निर्मात्यांची पहिली पसंती होती. मात्र,  नकुल मेहतासोबतची आपली जोडी पडद्यावर चांगली दिसणार नाही असे दिव्यांकाला वाटले म्हणून तिने त्या मालिकेत काम करण्यास नकार दिला.

मोना सिंह

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांक धरुन आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रूपाली गांगुलीला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. पण रुपालीच्या आधी मोना सिंगची निवड या मुख्य भूमिकेसाठी झाली होती. अभिनेत्रीने शो करण्यास नकार दिला, त्यानंतर ही भूमिका रूपाली गांगुलीच्या हाती गेली.

गौरव खन्ना

टीव्हीवरील गुम है किसी के प्यार मै ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडण्यात यशस्वी झाली आहे. या मालिकेत विराट ही प्रमुख भूमिका अभिनेता नील भट्ट साकारत आहे. पण त्याच्याआधी या भूमिकेसाठी गौरव खन्नाला विचारण्यात आले होते. पण गौरवने या भूमिकेस नकार दिल्यामुळे ही भूमिका नील भट्टला मिळाली.

सनाया ईरानी

ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे सतत मनोरंजन करत आहे. सनाया इराणीला निर्मात्यांनी या मुख्य भूमिकेसाठी प्रथम संपर्क साधला होता, परंतु तिने ही भूमिका करण्यास नकार दिला, त्यानंतर शिवांगी जोशीला त्यासाठी अंतिम करण्यात आले. शिवांगी जोशीने ही व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळवली.

देवोलीना भट्टाचार्जी

‘साथ निभाना साथिया’ या टीव्ही मालिकेत गोपी बहूची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीनेही हिट शो करण्यास नकार दिला होता. असे म्हटले जाते की निर्मात्यांनी तिला ‘ये है चाहतें’मध्ये मुख्य भूमिकेची ऑफर दिली होती, परंतु देवोलीनाने ही भूमिका करण्यास नकार दिला होता. ही मालिकाही प्रेक्षकांना खूप आवडली होती. मात्र, देवोलीनाला आज तिच्या निर्णयाचा पश्चाताप झाला असावा.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम