इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमधून या अभिनेत्री कित...

इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमधून या अभिनेत्री किती पैसे कमावतात माहितीये? एका पोस्टसाठी आलिया घेते एक कोटी तर दीपिका… (From Deepika To Alia: How Much Bollywood Celebs Earn From One Instagram Post)

बॉलिवूड अभिनेत्रींनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एखादी पोस्ट टाकली की ती लगेच व्हायरल होते. आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यामुळे काही क्षणात ती पोस्ट लाखो-करोडो चाहत्यांपर्यंत पोहोचते. परंतु इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमधून या अभिनेत्री किती पैसे कमावतात माहितीये?

अभिनयासोबतच सेलिब्रिटी इतर अनेक माध्यमातूनही पैसे कमावतात. सोशल मीडिया वा इन्स्टाग्राम हे त्यापैकीच एक माध्यम आहे, जेथून बॉलिवूड सेलिब्रिटी खोऱ्याने पैसे कमावत आहेत. आज आपण बॉलिवूडमधील दीपिका पादुकोणपासून ते आलिया भट्टपर्यंत काही आघाडीच्या अभिनेत्रींना एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी किती पैसे मिळतात हे जाणून घेऊया.

‘देसी गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचे इन्स्टाग्रामवर ७९.४ मिलियन फॉलोवर्स आहेत. प्रियांका सोशल मीडियावर सक्रिय असून एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी ती १.८० कोटी रुपये मानधन घेते.

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण अभिनयाप्रमाणेच सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते. दीपिकाचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. इन्स्टाग्रामवर दीपिकाचे ६७.४ मिलियन फॉलोवर्स असून एका पोस्टसाठी ती १.५ कोटी रुपये घेते.

आलिया भट्ट बॉलिवूडमध्ये आली अन्‌ तिने तिच्या अभिनयाच्या जादूने सर्व जिंकले. इन्स्टाग्रामवर आलियाचे ६६.४ मिलियन फॉलोवर्स असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांमध्ये वाढ होताना दिसतेय. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एका पोस्टसाठी आलियाही एक कोटी रुपये मानधन घेते.

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा चाहता वर्गही काही कमी नाही. कतरिना सोशल मीडियावर सक्रीय असून एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी ती ९७ लाख रुपये मानधन घेते. कतरिनाचे इन्स्टाग्रामवर ६५.२ मिलियन फॉलोवर्स आहेत.

अभिनेत्री अनुष्का शर्मा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अनुष्काचे इन्स्टाग्रामवर ५९ मिलियन फॉलोवर्स आहेत आणि एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी अनुष्का ९५ लाख रुपये मानधन घेत असल्याची माहिती आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान नेहमीच चर्चेत असते. करीना सोशल मीडियावर सक्रीय असून तिचे इन्स्टाग्रामवर ९.२ मिलियन फॉलोवर्स आहेत. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एका पोस्टसाठी करीना एक कोटी रुपये मानधन घेते.

(सर्व फोटो : इन्स्टाग्राम )