बॉलिवूडमधील सर्वात जास्त उंचीच्या अभिनेत्री (Fr...

बॉलिवूडमधील सर्वात जास्त उंचीच्या अभिनेत्री (From Deepika Padukone To Sushmita Sen, These Are The Tallest Actresses Of Bollywood, You Will Be Stunned To Know The Height)

कोणत्याही व्यक्तीच्या सौंदर्यात त्यांची उंची खूप महत्त्वाची असते. काही बॉलिवूड अभिनेत्री या बाबतीत खूप भाग्यवान आहेत. त्या दिसायला सुंदर तर आहेच, पण त्यांची उंचीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भर घालते. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची उंची नायकांपेक्षा जास्त आहे. अनेक मुलाखतींमध्ये त्या अभिनेत्रींनी खुलासा केला आहे की, नायकापेक्षा आमची  उंची जास्त असल्यामुळे शूटिंगदरम्यान खूप अडचणी येतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांची उंची खूप जास्त आहे.

दीपिका पादुकोण

बॉलिवूडच्या सर्वात यशस्वी आणि सुंदर अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असलेल्या दीपिका पादुकोणची उंची खूप जास्त आहे. तिची उंची 5 फूट 9 इंच आहे. त्यामुळे अभिनयासोबतच उंचीच्या बाबतीतही दीपिका अनेक अभिनेत्रींना मागे टाकते. इतर अभिनेत्रींच्या तुलनेत दीपिकाचा चाहता वर्गही मोठा आहे.

अनुष्का शर्मा

 बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा देखील उंचीच्या बाबतीत कमी नाही. या अभिनेत्रीने शाहरुख खानसोबत ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून करीअरची सुरुवात केली होती. आजच्या काळात ती इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अनुष्काच्या उंचीबद्दल बोलायचे झाले तर तिचीही उंची दीपिका पादुकोणसारखी 5 फूट 9 इंच आहे.

सुष्मिता सेन

1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणाऱ्या सुष्मिता सेनने बॉलिवूड चित्रपटांमध्येही यश मिळवून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. सुष्मिता सेनच्या उंचीबद्दल बोलायचे झाले तर तिची उंची 5 फूट 9.5 इंच आहे. सुष्मिताच्या उंचीमुळे गोविंदाने ‘क्योंकी मैं झुठ नहीं बोलता’ या चित्रपटातील सीन शूट करण्यासाठी स्टूलचा वापर केल्याचे सांगितले जाते.

नर्गिस फाखरी

‘रॉकस्टार’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करीअरची सुरुवात करणारी अभिनेत्री नर्गिस फाखरीची उंचीही चांगलीच आहे. नर्गिस फाखरी 5 फूट 8.8 इंच उंच आहे.

युक्ता मुखी

माजी मिस वर्ल्ड युक्ता मुखीची उंचीही खूप जास्त आहे. युक्ता मुखी 2002 मध्ये ‘प्यासा’ चित्रपटात दिसली होती. युक्ता मुखीची उंची 6 फूट 1 इंच आहे.