दीपिका पादुकोण ते अनुष्का शर्मा पर्यंत या बॉलिव...

दीपिका पादुकोण ते अनुष्का शर्मा पर्यंत या बॉलिवूडच्या तारकांनी लग्नानंतर आपलं आडनाव बदललं नाही (From Deepika Padukone To Anushka Sharma- These Bollywood Actresses Did Not Use Their Husband’s Surname)

अलीकडेच देसी गर्ल प्रियांका चोप्राने तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून तिच्या पतीचे आडनाव  काढून टाकल्याने काय गोंधळ झाला ते आपण पाहिले. तिने सासरचं आडनाव काढलं म्हणजे त्यांचं नातं फिस्कटलं की काय अशी चाहत्यांना शंका आली. पण बॉलिवूडमध्ये अशा काही तारका आहेत ज्यांनी कधीही आपल्या पतीचे आडनाव लावलेले नाही. पाहूया या तारका कोण आहेत.

दीपिका पादुकोण

Deepika Padukone, Anushka Sharma, Bollywood Actresses, Husband’s Surname

अभिनेत्री दीपिका पादुकोणने २०१८ मध्ये रणवीर सिंगसोबत सात फेरे घेतले. लग्नानंतर दीपिकाने आपले आडनाव बदलले नाही. त्यावेळेस दिलेल्या एका मुलाखतीत जेव्हा दीपिकाला पापाराझींनी लग्नानंतर आडनाव बदलणार का? असे विचारले होते तेव्हा दीपिकानेही मोठ्या प्रेमाने सांगितले की, तिने तिचे आडनाव का बदलावे, रणवीर त्याचे नाव का बदलू शकत नाही. तो रणवीर सिंग पादुकोण असे आपले नाव लिहू शकतो. दीपिकाच्या या बोलण्यावरून स्पष्ट होतंय की तिला तिचे आडनाव बदलायचे नाही आहे.

अनुष्का शर्मा

Deepika Padukone, Anushka Sharma, Bollywood Actresses, Husband’s Surname

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने २०१७ मध्ये मोजक्या नातलग व मित्रांच्या उपस्थितीत विराट कोहलीसोबत लग्न केले. या जोडप्याच्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत. पण आजपर्यंत अनुष्काने कधीही तिच्या नावामध्ये पतीचे आडनाव ‘कोहली’ लावलेले नाही किंवा पती विराट कोहलीनेही तिला तिचे आडनाव बदलण्यास सांगितले नाही.

ट्विंकल खन्ना

Deepika Padukone, Anushka Sharma, Bollywood Actresses, Husband’s Surname

ट्विंकल खन्नाने अभिनेता अक्षय कुमारशी लग्न केल्यानंतर बॉलिवूडला अलविदा केले. डिझायनर, स्तंभलेखिका, चित्रपट निर्माती आणि लेखिका ट्विंकल खन्नाची इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख आहे. आजही ती स्वतःच्या नावापुढे पतीचे आडनाव न लावता तिच्या वडिलांचे आडनाव लावते.

विद्या बालन

Deepika Padukone, Anushka Sharma, Bollywood Actresses, Husband’s Surname

परिणीतासारख्या सुपरहिट चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या विद्या बालननेही आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या आदित्य रॉय कपूरसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. लग्नानंतर विद्याने पती सिद्धार्थ रॉय कपूरचे आडनाव कधीच लावले नाही. विद्या आता तिचे आडनाव बदलणार असल्याची चर्चा इंडस्ट्रीत होत असली, तरी विद्याने तिचे आडनाव बदलले नाही किंवा तिचा पती आदित्यनेही तिला कधी आडनाव बदलण्यास सांगितले नाही.

सोहा अली खान

Deepika Padukone, Anushka Sharma, Bollywood Actresses, Husband’s Surname

चित्रपट ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेत्री सोहा अली खानने कुणाल खेमूसोबत लग्न केले आहे. नवाबांच्या कुटुंबातील सोहा अलीने लग्नानंतर आपले आडनाव बदललेले नाही. आजही सोहाची सोशल मीडिया प्रोफाइल सोहा अली खानच्या नावावर आहे.