आयटम सॉंगवर थिरकण्यासाठी या अभिनेत्री घेतात बक्...

आयटम सॉंगवर थिरकण्यासाठी या अभिनेत्री घेतात बक्कळ पैसे..(From Chikni Chameli to Dilbar and O Antava Song, These Actresses Charge Whopping Amount For Sexy Moves In Item Songs)

सध्या बॉलिवूड  चित्रपटात मालमसाला टाकण्यासाठी आयटम साँगचा तडका दिला जातो. काही वेळेस ही आयटम साँग इतकी लोकप्रिय होतात की ती चित्रपटाची ओळख बनतात. पण पडद्यावर आयटम साँग करण्यासाठी अभिनेत्री भरमसाठ पैसे घेतात. आज आपण कोणत्या अभिनेत्रीने कोणत्या आयटम सॉंगसाठी किती पैसे घेतले ते जाणून घेणार आहोत.

नोरा फतेही

‘साकी साकी’, ‘एक तो कम जिंदगानी’, ‘दिलबर’ ते ‘जालिमा कोका कोला’ सारखे सुपरहॉट आयटम नंबर करून आयटम सॉंग क्वीन बनलेल्या नोरा फतेहीच्या डान्स मूव्ह्ज् पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आयटम साँग करण्यासाठी नोरा सर्वाधिक मागणी असलेली अभिनेत्री आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोरा फतेही एका आयटम साँगसाठी 2 कोटी रुपये घेते.

सनी लिओनी

अॅडल्ट फिल्म्सद्वारे बॉलिवूडच्या दुनियेत आलेल्या सनी लिओनीच्या डान्सलाही प्रेक्षक प्रचंड पंसती दर्शवतात. आजही जेव्हा कोणत्याही पार्टी किंवा समारंभात ‘लैला में लैला’ आणि ‘बेबी डॉल’ सारखी आयटम साँग वाजवली जातात तेव्हा उपस्थितांचे पाय आपसूकच थिरकण्यास सुरुवात होते. 

कतरिना कैफ

कतरिना कैफ तिच्या अभिनयाव्यतिरिक्त आयटम साँगमधील तिच्या सेक्सी डान्स मूव्ह्ज् साठी प्रसिद्ध आहे. ‘चिकनी चमेली’, ‘शीला की जवानी’  तिचे हे आयटम नंबर विशेष गाजले आहेत. तिचा डान्स पाहताना अनेकजण तल्लीन होतात. कतरिना एका आयटम सॉंगसाठी 50 लाख रुपये घेतल्याचे बोलले जाते.

समंथा रुथ प्रभू

अल्लू अर्जुनच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटातील आयटम नंबर ‘ओ अंतवा’ मध्ये बोल्ड आणि घायाळ करणाऱ्या मूव्हज् ने सर्वांना थक्क करणारी समंथा रुथ आयटम सॉंगसाठी भरमसाठ पैसे घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथा रुथने या आयटम साँगसाठी 5 कोटी रुपये घेतले होते.

जॅकलिन फर्नांडिस

आयटम सॉंगवर जॅकलीन फर्नांडिस तिच्या चाहत्यांना बेभान करत असते. तिने अनेक आयटम नंबरवर डान्स केला आहे. तिचे सगळे आयटम नंबर हिट होतात. त्यासाठी ती निर्मात्यांकडून बक्कळ पैसेही घेते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकलीन फर्नांडिस एका आयटम साँगसाठी 3 कोटी रुपये घेते.

चित्रांगदा सिंग

चित्रांगदा सिंगचा हॉट आणि बोल्ड लूक लोकांची झोप उडवण्यासाठी पुरेसा आहे, जेव्हा ती त्यावर सेक्सी डान्स करते तेव्हा तिच्या चाहत्यांना घायाळ व्हायला होते. ‘कुंडी मत सरकाओ राजा’ हे गाणे एवढे हिट झाले की तरुणाई या गाण्यावर बेधुंद होऊन नाचते. चित्रांगदाने या आयटम सॉंगसाठी 60 लाख रुपये घेतले होते.