बी ग्रेड चित्रपटांमधून बोल्ड सीन देत टॉपची अभिन...

बी ग्रेड चित्रपटांमधून बोल्ड सीन देत टॉपची अभिनेत्री बनलेल्या कतरिना कैफची फिल्मी सफर (From B Grade Movies To A Successful Actress : Katrina Kaif’s Bollywood Journey)

कतरिना कैफ आणि विकी कौशल उद्याच्या दिवशी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. आज कतरिनाचा गवगवा होत असला तरी आघाडीची अभिनेत्री होण्यापूर्वी कतरिना बी ग्रेड चित्रपटांमधून काम करत होती, हे फारच कमी लोक जाणतात. इतकंच काय पण या चित्रपटात तिने बेहद्द बोल्ड सीन्स दिले होते. या चित्रपटाचं नाव होतं ‘बुम’. अन्‌ त्यामध्ये अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, गुलशन ग्रोव्हर असे दिग्गज कलाकार होते.
बोल्ड सीन दिले म्हणून कतरिनाने लक्ष वेधून घेतले होते. पण तिला अभिनयाचा गंध तरी आहे का, म्हणून प्रश्न उठले होते. ‘मैंने फ्यार क्यूं किया’ या चित्रपटात सलमान खानने कतरिनाला नायिका म्हणून संधी दिली. तिथून ती नावारूपास आली. भारतात येण्यापूर्वी ती लंडनमध्ये मॉडेलिंग करत होती. पण या चित्रपटातून ती गाजली. सलमानशी तिचे अफेअर असल्याच्या चर्चा तेव्हा खूप रंगल्या होत्या.

बी ग्रेड चित्रपट, बोल्ड सीन, कतरिना कैफ, B Grade Movies, Katrina Kaif, Bollywood Journey

‘नमस्ते लंदन’ हा चित्रपट कतरिनाने अक्षय कुमार सोबत केला, तेव्हा तिला मोठे यश मिळाले. शिवाय तिचे नाव अक्षयशी जोडले गेले.
अक्षय सोबत तिने वेलकम, सिंग इज किंग, हेराफेरी ३, सूर्यवंशी, तीस मार खां असे अनेक चित्रपट केले. तर सलमान सोबत पार्टनर, एक था टायगर हे चित्रपट केले.

बी ग्रेड चित्रपट, बोल्ड सीन, कतरिना कैफ, B Grade Movies, Katrina Kaif, Bollywood Journey

यानंतर कॅटने रणबीर कपूर सोबत अजब प्रेम की गजब कहानी हा चित्रपट केला. तेव्हा दोघांचे प्रेम इथे जुळले. ४-५ वर्षे दोघे नातेसंबंध जोडून राहिले. नंतर ते वेगळे झाले. पण तोपर्यंत कतरिनाने चित्रसृष्टीत पाय चांगलेच रोवले होते. चिकनी चमेली, शीला की जवानी या नृत्यगीतांमधून तिची नृत्यकला बहरली होती.

बी ग्रेड चित्रपट, बोल्ड सीन, कतरिना कैफ, B Grade Movies, Katrina Kaif, Bollywood Journey

हाँगकाँगमध्ये जन्मलेली कतरिना वयाच्या १४व्या वर्षापासून मॉडेलिंग करत होती. आज ती यशस्वी आहे. आता दुल्हन होते आहे. तिचा विवाह भव्य प्रमाणावर साजरा होत आहे.