अनुष्का शर्मा ते करीना कपूर खानपर्यंत, या आहेत ...
अनुष्का शर्मा ते करीना कपूर खानपर्यंत, या आहेत बॉलिवूडच्या यशस्वी सुपर मॉम्स (From Anushka Sharma to Kareena Kapoor Khan, These Are Successful Super Moms of Bollywood)

बॉलिवूडमधील काही सुंदर अभिनेत्रींनी (Successful Super Moms of Bollywood) आपल्या अभिनयकौशल्याने आणि अदांनी लाखो-करोडो लोकांच्या हृद्यावर राज्य केले आहे. या अभिनेत्री त्यांच्या व्यावसायिक जीवनात जितक्या सफल ठरल्या आहेत तितक्याच त्यांच्या खाजगी आयुष्यातही त्या यशस्वीपणे त्यांच्या जबाबदाऱ्या पाड पाडत आहेत. लग्नानंतर या अभिनेत्रींनी आपलं घर-परिवार आणि मुलं यांच्या जबाबदारीसोबतच करिअरसाठीही खूप मेहनत घेतली आहे. तर मग जाणून घेऊया अनुष्का शर्मा ते करीना कपूर खानपर्यंतच्या बॉलिवूडमधील काही यशस्वी सुपर मॉम्सबद्दल, ज्या सामान्य स्त्रियांप्रमाणेच आपलं मातृत्त्व निभावत आहेत.
अनुष्का शर्मा

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
२०२१ सालाच्या सुरुवातीलाच अनुष्का शर्माने एका मुलीला जन्म दिला. लवकरच वामिका एक वर्षांची होईल. दरम्यान अनुष्काने वामिकाच्या संगोपनासाठी स्वतःला चित्रसृष्टीपासून दूर ठेवले. या मधल्या काळात तिने फक्त आपल्या मुलीच्या पालनाकडे तसेच स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष केंद्रित केले होते. लवकरच ती बॉलिवूडमध्ये परतणार असल्याचे म्हटले जात आहे. तिची एन्ट्री ग्रँड असणार आहे.
करीना कपूर खान

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
पतौडी खानदानाची सून आणि नवाब सैफ अली खानची बेगम करीना कपूर खान ही तैमूर आणि जेह अशा दोन मुलांची आई आहे. आपल्या मुलांची व्यवस्थित देखभाल करण्याबरोबरच करीनाने तिचं प्रोफेशनल लाइफ देखील नीट सांभाळलं आहे. जेहच्या जन्मापूर्वी पोटूशी असलेल्या करीनाने बेबी बंपसह चित्रपटात काम केले होते आणि त्याच्या जन्मानंतरही ती चित्रपटांमध्ये व्यस्त आहे.
ऐश्वर्या राय बच्चन

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
पूर्व विश्व सुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन एका मुलीची आई आहे. ऐश्वर्याने देखील आराध्याच्या जन्मानंतर काही काळ चित्रसृष्टीतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर जेव्हा तिने पुन्हा आपल्या कामास सुरुवात केली, त्यावेळेस तिचे चाहते तिला पाहण्यासाठी आसुसलेले होते. आराध्यासाठी ती सुपर मॉम तर आहेच, शिवाय ऐश्वर्याने आपलं घर-कुटुंबियांची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली आहे. अन् हे करत असतानाच तिने ‘सरबजीत’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ यांसारख्या चित्रपटांत काम करून चाहत्यांचे मन जिंकले आहे.
शिल्पा शेट्टी

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम
दोन मुलांची आई असूनही शिल्पा शेट्टीच्या फिटनेसचे चाहते कायल आहेत. शिल्पा आपल्या दोन्ही मुलांचे अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन करताना दिसते. त्याचबरोबर तिचं प्रोफेशनल लाइफही उत्तम सुरू आहे. तिने हंगामा २ सिनेमा केला असून सध्या ती डान्सच्या रिॲलिटी शोची परीक्षक आहे.
मलाइका अरोरा

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
अरबाज खानची पूर्व पत्नी मलायका अरोराला चाहते तिच्या फिटनेस आणि सौंदर्यासाठीच बहुत करून ओळखतात. परंतु यासोबत ती एका मुलाची चांगली आई देखील आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर मलायकाने एक आई म्हणून आपली जबाबदारी पार पाडलीच शिवाय आपलं काम आणि फिटनेस बाबतही कोणताही निष्काळजीपणा केला नाही. तिची कमनीय शरीरयष्टी पाहता ती एका मुलाची आई आहे, हे ओळखणं तसं अवघड आहे.
सनी लियोनी

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
सनी लियोनी ही बॉलिवूडची हॉटेस्ट मॉम आहे. तिच्या चाहत्यांची लांबलचक यादीच आहे. सनी तीन मुलांची आई आहे अन् बरेचदा ती त्यांच्यासोबत स्पॉट केली गेली आहे. सनीने एक मुलगी दत्तक घेतली आहे आणि सरोगसीच्या मदतीने तिने दोन मुलांना जन्म दिला आहे. आपल्या मुलांना वाढवतानाच सनी लियोनीने स्वतःच्या करिअरकडेही विशेष लक्ष दिले आहे.