केवळ अभिनयातच नाही तर अभ्यासात सुद्धा हुशार आहे...

केवळ अभिनयातच नाही तर अभ्यासात सुद्धा हुशार आहेत या तरुण अभिनेत्री (From Anushka Sen and Palak Tiwari to Jannat Zubair, These Young Actresses Are Top Not Only in Acting but also in Studies)

छोट्या पडद्यावर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लाखो मनांवर राज्य करतात, परंतु इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर देण्यात आजच्या तरुण अभिनेत्री अजिबात मागे नाहीत. छोट्या पडद्यावर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या खूप लहान असूनही इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत. त्यांच्यापैकी अनेकजणींनी आपल्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीत स्थान मिळवले आहे. असे असूनहूी त्या आपल्या अभ्यासावर सुद्धा लक्ष केंद्रित करतात.

अनुष्का सेन

या यादीत पहिले नाव येते टीव्हीवरील तरुण अभिनेत्री अनुष्का सेनचे, ती दीर्घकाळापासून छोट्या पडद्यावर काम करत आहे. कमी वयात नाव आणि प्रसिद्धी मिळवणारी अनुष्का सेन अभिनयासोबतच अभ्यासालाही महत्त्व देते. अभिनेत्री मुंबईतून फिल्मोग्राफीचे शिक्षण घेत आहे.

पलक तिवारी

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आपल्या बॉलिवूड डेब्यूमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. पलकची सोशल मीडियावरही जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. ती आतापासूनच लोकांच्या मनावर राज्य करत आहे. पलकच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर ती मानसशास्त्राचा अभ्यास करत आहे.

जन्नत जुबैर

टीव्हीवरील तरुण आणि सुंदर अभिनेत्री जन्नत जुबेरने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसलेली जन्नत आता पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत धुमाकूळ घालत आहे. मात्र, अभिनयासोबतच ती आपल्या अभ्यासावरही पूर्ण लक्ष देते. जन्नत मुंबईतील एका कॉलेजमधून ग्रॅज्युएशन करत आहे.

अवनीत कौर

टीव्ही अभिनेत्री अनवीत कौरनेही बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, पण अभ्यासाच्या बाबतीतही अवनी खूप हुशार आहे. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती अभ्यासातही चांगली आहे. सध्या अभिनेत्री वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण घेत आहे.

निधी भानुशाली

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सोनूची भूमिका साकारून लोकप्रिय झालेली तरुण अभिनेत्री निधी भानुशाली हिने बीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. निधीला मानसशास्त्रज्ञ व्हायचे आहे, त्यासाठी ती खूप मेहनत घेत असल्याचे सांगितले जाते.

पलक सिंधवानी

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सोनूच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री पलक सिंधवानी अभ्यासातही अव्वल आहे. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या पलकने बॅचलर ऑफ मास मीडियाचे शिक्षण घेतले आहे.