आलीया भट्ट, ऐश्वर्या राय व बॉलिवूडच्या इतर कलाक...

आलीया भट्ट, ऐश्वर्या राय व बॉलिवूडच्या इतर कलाकारांनी दाक्षिणात्य चित्रपटात आपली चमक दाखवली आहे. (From Aliya Bhatt To Aishwarya Rai, These Bollywood Stars Have Shown Their Acting Skills In South Films)

सध्या दाक्षिणात्य चित्रपट, बॉलिवूडच्या चित्रपटांशी जबरदस्त स्पर्धा करत आहेत. त्यामुळे दाक्षिणात्य कलावंत सुपरस्टार झालेले आहेत. तरीपण बॉलिवूडच्या बऱ्याच टॉप कलावंतांनी दाक्षिणात्य चित्रपटात आपली चमक दाखवली आहे.

आलिया भट्ट
सध्या ‘आर आर आर’ हा दक्षिणेची निर्मिती असलेला चित्रपट तुफान चालतो आहे. त्यामध्ये आलिया भट्टने सीतेची भूमिका केली आहे. ही भूमिका छोटी आहे, पण लोकांना ती आवडली आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

ऐश्वर्या राय
बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या रायने हिंदी चित्रपट गाजवले. आता ‘पीएस १’ या दाक्षिणात्य चित्रपटात ती दिसणार आहे. भूमिका कितपत चांगली आहे, ते चित्रपट आल्यावर कळेल, पण चित्रपटाचे पोस्टर पाहता तिची भूमिका चांगली असावी.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
सलमान खान
बॉलिवूडचा दबंग हिरो सलमान खान दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीच्या ‘गॉडफादर’ या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करताना दिसणार आहे. थोडया वेळासाठी का होईना, पण यात सलमान दमदार ऍक्शन करणार आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

अजय देवगण
दाक्षिणात्य चित्रपटात आपली चमक दाखवण्यात अजय देवगण पण सामील आहे. त्याने ‘आर आर आर’ या चित्रपटात लहानशी भूमिका केली आहे. भूमिका लहान असली तरी अजयने आपली छाप पाडली आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
दीपिका पदुकोण
बॉलिवूडमध्ये टॉपला असलेली दीपिका पदुकोणने तर आपल्या करिअरची सुरुवातच दक्षिणेकडील चित्रपटातून केली आहे. दीपिकाने ‘ऐश्वर्या’ या कानडी चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर ‘कोचादाईयान’ या चित्रपटात ती रजनीकांत सोबत दिसली होती.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
सुनील शेट्टी 
बॉलिवूडचा अण्णा – सुनील शेट्टीने पण दाक्षिणात्य चित्रपटात आपली चुणुक दाखवली आहे. ‘मरक्कर’ या चित्रपटात त्याने छोटीशी भूमिका केली होती. भूमिका लहान होती, पण त्याने आपली छाप पाडली होती.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम