गरोदरपणानंतर अशाप्रकारे या अभिनेत्रींनी केले स्...

गरोदरपणानंतर अशाप्रकारे या अभिनेत्रींनी केले स्वत:ला फिट(From Alia To Aishwarya, This Is How These Actresses Kept Themselves Fit After Becoming A Mother)

टीव्ही आणि चित्रपटांमध्ये यश मिळविण्यासाठी तंदुरुस्त राहणे खूप महत्वाचे असते, म्हणूनच सर्व अभिनेते आणि अभिनेत्री स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करतात. खाण्यापिण्यापासून ते शारीरिक व्यायामांपर्यंत ते खूप जागरूक असतात. अभिनेत्रींच्या वाढलेल्या वजनामुळे अनेकदा त्यांना चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो. त्यामुळेच अभिनेत्रींना स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे खूप गरजेचे असते. विशेषत: जर एखादी अभिनेत्री आई झाली असेल तर गर्भधारणेदरम्यान तिचे वजन नक्कीच वाढते. अशा परिस्थितीत, आई झाल्यानंतर, तिच्यासाठी स्वत:ला पुन्हा फिट करणे खूप आव्हानात्मक होते. मात्र आई झाल्यानंतर याच अभिनेत्रींनी स्वत:ला पूर्वीसारखे फिट करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहेच शिवाय इतरांनाही प्रेरित करण्याचे काम केले आहे.

आलिया भट्ट

 बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने काही महिन्यांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्रीने आपल्या मुलीचे नाव राहा ठेवले आहे. गरोदरपणात इतर महिलांप्रमाणे आलियाचेही वजन खूप वाढले होते, पण आलिया लवकरच पुन्हा फिट झाली. आता आलियाला पाहून कोणीही म्हणू शकत नाही की ती नुकतीच आई झाली आहे. काही दिवसांपूर्वी, आपल्या फिटनेस प्रवासाशी संबंधित एक पोस्ट शेअर करताना, आलियाने लिहिले होते की, प्रसूतीनंतर, मी माझी ट्रेनर अनुष्काच्या मार्गदर्शनाखाली एरियल योगासने करण्यात यशस्वी झाले आता मी हळूहळू स्वतःशी एकरूप करण्याचा प्रयत्न करत आहे. नवीन मातांसाठी, आलियाने सुचवले की प्रसूतीनंतर तुमच्या शरीराचे ऐका आणि तुमचे पोट जे करण्यास नकार देईल असे काहीही करू नका.

करीना कपूर खान

 करीना कपूर खानने आपल्या झिरो साइज फिगरने इंडस्ट्रीत एक वेगळा फिटनेस ट्रेण्ड निर्माण केला आहे. आजच्या काळात करीना दोन मुलांची आई आहे. दोन्ही गरोदरपणात अभिनेत्रीचे वजन वाढले होते. मात्र मुलांच्या जन्मानंतर काही महिन्यांतच करीनाने पुन्हा स्वत:ला पूर्वीप्रमाणे फिट केले. करीनाने अवघ्या 3 महिन्यांत 16 किलो वजन कमी केले होते. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी अभिनेत्री डाएटसोबतच खूप कडक वर्कआउटही फॉलो करते.

ऐश्वर्या राय

 2007 मध्ये अभिषेक बच्चनसोबत लग्न केल्यानंतर 4 वर्षांनी ऐश्वर्या राय आई झाली. यादरम्यान अभिनेत्रीचे वजन खूप वाढले होते, परंतु तिनेही लवकरच आपले वजन कमी केले. एका मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याने सांगितले की, प्रसूतीनंतर वजन कमी करण्यासाठी ती खूप सोपी रूटीन फॉलो करते. मेटाबॉल्जिम  वाढवण्यासाठी ती सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट लिंबूपाणी प्यायची. त्याचबरोबर फळांचा रस, कडधान्ये, उकडलेल्या भाज्या, चपाती इत्यादींचा आहारात ती समावेश करत असे. जीम ऐवजी ती योगावर जास्त अवलंबून असायची.

शिल्पा शेट्टी

 ४७ वर्षीय शिल्पा शेट्टी किती फिटनेस फ्रीक आहे हे सर्वांनाच माहिती आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी ती इतरांनाही टिप्स आणि युक्त्या देत असते. 2012 मध्ये शिल्पाने आपला मुलगा विआनला जन्म दिला. गरोदरपणात शिल्पाचे वजनही वाढले होते, मात्र योगाच्या मदतीने अभिनेत्रीने स्वत:ला पुन्हा फिट केले. शिल्पा दररोज आपले योगा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.