लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करण्यासाठी ग्लॅम...

लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करण्यासाठी ग्लॅमरस अभिनेत्री सज्ज (From Alia Bhatt to Mouni Roy, These Actresses Will Celebrate First Diwali after Marriage)

हिंदू धर्मात साजऱ्या होणाऱ्या सणांपैकी दिवाळी या सणाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. प्रत्येकजण आपापल्या परीने दिवाळीचा सण संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः लग्नानंतर सासरी आलेल्या मुलींसाठी लग्नानंतरची पहिली दिवाळी खूप खास असते. बॉलिवूड आणि टीव्हीबद्दल बोलायचे झाले तर ग्लॅमर इंडस्ट्रीशी संबंधित अनेक अभिनेत्री लग्नानंतर पहिल्यांदाच सासरच्या घरी दिवाळी साजरी करणार आहेत.

आलिया भट्ट

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आलिया भट्ट लग्नानंतरची पहिली दिवाळी सासरच्या घरी साजरी करणार आहे. लग्नानंतरची ही दिवाळी आलियासाठी खूप महत्त्वाची आहे. या वर्षी 14 एप्रिल रोजी आलियाने रणबीर कपूरसोबत लग्न केले होते लवकरच ती आई होणार आहे.

कतरीना कैफ

बॉलिवूडची बार्बी डॉल कतरीना कैफने गेल्या वर्षी 9 डिसेंबर 2021 ला प्रियकर विकी कौशलसोबत विवाहगाठ बांधली. लग्नानंतर कतरीना पहिली दिवाळी आणि लक्ष्मीपूजन आपल्या सासरच्या घरी साजरी करणार आहे.

मौनी रॉय

छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाची आणि सौंदर्याची छाप पाडणारी टीव्हीवरील सुंदर नागिन मौनी रॉय यावर्षी २७ जानेवारीला आपला प्रियकर सूरज नांबियारसोबत विवाहबंधनात अडकली. पत्नी आणि सून म्हणून मौनी यंदा आपली पहिली दिवाळी सासरच्या घरी साजरी करणार आहे.

रिचा चढ्ढा

बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रिचा चढ्ढाने यावर्षी 23 सप्टेंबरला आपला प्रियकर अली फजलसोबत लग्न केले. रिचा लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करण्यासाठी खूप उत्सुक आहे.

शिवानी दांडेकर

‘शानदार’ आणि ‘नूर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री आणि गायिका शिवानी दांडेकर यावर्षी 19 फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकली. तिने सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तरसोबत लग्न केले आहे. लग्नानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच सासरच्या घरी दिवाळी साजरी करणार आहे.

अंकिता लोखंडे

‘पवित्र रिश्ता’मधून घरोघरी लोकप्रियता मिळवणारी टीव्हीवरील सुंदर अभिनेत्री अंकिता लोखंडे गेल्या वर्षी १४ डिसेंबरला विवाहबंधनात अडकली. बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न केल्यानंतर अंकिता आपली पहिली दिवाळी सासरच्या घरी साजरी करण्यासाठी सज्ज झाली आहे.

नयनतारा

साऊथ चित्रपटांची लेडी सुपरस्टार म्हटली जाणारी नयनताराही यावर्षी पत्नी म्हणून पहिली दिवाळी साजरी करणार आहे. अभिनेत्रीने यावर्षी 9 जून रोजी चित्रपट दिग्दर्शक विघ्नेश शिवन यांच्याशी लग्न केले आणि नुकतेच हे जोडपे सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत.