बॉलिवूडच्या या कलाकारांना भारतात मतदान करण्याचा...

बॉलिवूडच्या या कलाकारांना भारतात मतदान करण्याचा अधिकार नाही (From Alia Bhatt to Deepika Padukone, These Bollywood Stars do Not Have Right to Vote in India)

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक दिग्गज कलाकार आहेत जे परदेशातूनही आले आहेत. आज हे कलाकार आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. चित्रपटांमध्ये अभिनय करून हे कलाकर करोडोंची कमाई करतात. पण हे कलाकार भारतात राहूनही त्यांना इथे मतदानाचा अधिकार नाही.

आलिया भट्ट

कोट्यवधी तरुणांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या दहा वर्षांच्या फिल्मी करीअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिला देशाच्या कोणत्याही निवडणूकीत मतदान करण्याचा अधिकार नाही. आलिया भट्टचा जन्म लंडनमध्ये झाला, त्यामुळे आलिया भट्टकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे.

दीपिका पादुकोण

बॉलिवूडच्या सुंदर आणि टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेल्या दीपिका पादुकोणबद्दल असे म्हटले जाते की, तिचा जन्म डेन्मार्कमध्ये झाला आहे, तिच्याकडे डॅनिश नागरिकत्व आहे. त्यामुळे दीपिकाला भारतात मतदानाचा अधिकार नाही.

अक्षय कुमार

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमारचा जन्म भारतातच झाला असला तरी त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे. बॉलिवूड चित्रपटांतून तो करोडोंची कमाई करत असला तरी कॅनडाचा नागरिक असल्यामुळे अक्षय कुमार भारतात मतदान करू शकत नाही.

कतरीना कैफ

बॉलिवूडची बार्बी डॉल कतरीना कैफने विकी कौशलसोबत लग्न केल्यानंतर भारतीय पंजाबी कुटुंबाची सून झाली. मात्र तरीही तिला भारतात मतदानाचा अधिकार नाही. कतरीना कैफचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला आहे, तिचे आई-वडील ब्रिटिश नागरिक आहेत, त्यामुळे कतरीनाकडेही ब्रिटिश नागरिकत्व आहे.

जॅकलिन फर्नांडिस

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक जॅकलिन फर्नांडिस हिच्याकडे श्रीलंकेचे नागरिकत्व आहे. या अभिनेत्रीने 2006 मध्ये मिस युनिव्हर्ससाठी श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले होते. जॅकलिनने भारतात राहून चित्रपटांच्या माध्यमातून करोडोंची कमाई केली असली तरी श्रीलंकेची नागरिक असल्याने तिला भारतात मतदानाचा अधिकार नाही.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम