करीना कपूरच्या वाढदिवसाला या कलाकारांनी लावली ह...

करीना कपूरच्या वाढदिवसाला या कलाकारांनी लावली हजेरी (From Alia Bhatt-Ranbir Kapoor To These Stars Reached At Kareena Kapoor Birthday Party, See Photos And Video)

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने काल आपला 42 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त बेबोने आपल्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांसाठी घरी डिनर पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला रणबीर कपूर, आलिया भट्ट ते अभिनेत्रीची खूप जवळची मैत्रीण मलायका अरोरा, कुणाल खेमू आणि सोहा अली खानसह अनेक सेलिब्रिटी आले होते. बेबोच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचलेल्या बॉलिवूड स्टार्सची एक झलक पाहा.

करीनाने आपला वाढदिवस खास बनवण्यासाठी आपले कुटुंबिय आणि जवळील मित्रमंडळींसाठी रात्री जेवणाचे आयोजन केले होते.

कुणाल खेमू-सोहा अली, मलायका अरोरा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी करीना कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. तसेच ब्रह्मास्त्र फेम रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी देखील जोडीने या पार्टीला हजेरी लावली होती.

आलिया आणि रणबीर जेव्हा बेबोच्या पार्टीला गेले तेव्हा त्यांनी तिथे उपस्थित पापाराझींना एकत्र पोज दिल्या. त्यानंतर दोघेही घरात गेले.

पार्टीसाठी रणबीरने जीन्स आणि निळ्या रंगाचा टीशर्ट घातला होता तर आलियाने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. त्यात ती खूप सुंदर दिसत होती.

त्यानंतर बेबोची सगळ्यात जवळची मैत्रीण आणि बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्री मलायका अरोरासुद्धा या पार्टीला आली होती. नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा मलायका बोल्ड लूकमध्ये दिसली.

करीना कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीला अभिनेता कुणाल खेमू खूपच स्टाइलिश अंदाजात दिसला.

इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध फॅशन डिझाइनर आणि करीनाच्या जवळीच्या मित्रांपैकी एक असलेला मनीष मल्होत्रासुद्धा या पार्टीला गेला होता.