‘केके’ च्या निधनाने बॉलीवूड शोकाकुल : अक्षय कुम...

‘केके’ च्या निधनाने बॉलीवूड शोकाकुल : अक्षय कुमार पासून अभिषेक बच्चनने वाहिली श्रद्धांजली (From Akshay Kumar To Abhishek Bachhan – These Celebs Mourn KK’s Demise)

आपला छानसा आवाज आणि छान छान गाण्यांनी चाहत्यांची मने रिझवणाऱ्या लोकप्रिय गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने काल निधन झाले. कृष्णकुमार कुन्नथ (केके) यांच्या निधनाच्या वार्तेने बॉलिवूडमध्ये  शोककळा पसरली आहे. या क्षेत्रातील मान्यवर सोशल मीडियावर केकेला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
काल रात्री कोलकाता येथे कार्यक्रम सादर करत असतानाच रंगमंचावर त्याची तब्येत बिघडली. कार्यक्रम संपल्यावर तो हॉटेलात आला. तेव्हा त्याची तब्येत अधिकच बिघडली. म्हणून त्याच्या सहकार्‍यांनी त्याला हॉस्पिटलात नेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या लोकप्रिय गायकाचे मित्र, चाहते आणि फॉलोअर्स सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. तर अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, करण जोहर, अजय देवगण, सलीम मर्चंट आदी मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.


अक्षय कुमार

अजय देवगन

करण जोहर

सलीम मर्चंट

अभिषेक बच्चन

वरूण धवन

रश्मी देसाई

मिका सिंह

रणविर सिंह, विकी कौशल, निरमत यांनी आपण यांनी पण आपल्या आपल्या इन्स्टाग्राम स्टोरी वर श्रद्धांजली अर्पण केली आहे.