ऐश्वर्या राय ते दीपिका पादुकोण; या बॉलिवूड तारक...

ऐश्वर्या राय ते दीपिका पादुकोण; या बॉलिवूड तारकांच्या सौंदर्याचं गुपित (From Aishwarya Rai Bachchan To Deepika Padukone – Top 10 Beauty Secrets Of Actresses)

बॉलिवूड तारकांचं सौंदर्य पाहिलं की आपल्याला त्यांचा मत्सर वाटतो. या सौंदर्यवती आपल्या त्वचेसाठी काय वापरत असतील, त्वचेच्या सौंदर्यासाठी महागड्या उपचारपद्धतींचा वापर करत असतील का? कोणती आणि किती सौंदर्य प्रसाधनं वापरत असतील या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याची आपल्या मनात उत्सुकता असते. परंतु आपल्याला वाटतं तसं काही नाही आहे. अगदी जगत्‌सुंदरी ऐश्वर्यापासून ते दीपिका पादुकोण पर्यंत बऱ्याच तारका या आपल्या त्वचेचे सौंदर्य कायम राखण्यासाठी स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या सोप्या प्रसाधनांचा वापरत करतात. तुम्हीदेखील यांच्या सौंदर्याचं गुपित जाणून घ्या आणि त्यांच्यासारखं सौंदर्य मिळवा.

दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण झोपण्यापूर्वी आपली त्वचा स्वच्छ करण्यास कधीही विसरत नाही. सुंदर त्वचेसाठी क्लिन्जींग अतिशय गरजेचं आहे, असं ती म्हणते. या व्यतिरिक्त स्पा करायला तिला आवडतं. जेव्हा कधी दीपिका बेंगलुरुला आपल्या घरी जाते, त्यावेळेस स्वतःला तणावमुक्त करण्यासाठी ती स्पा ट्रीटमेंट जरुर घेते. या सगळ्याचा परिणाम आपल्याला तिच्या सुंदर त्वचेवर दिसतोच.

प्रियंका चोप्रा

प्रियंका आपल्या केसांच्या सौंदर्यासाठी खोबरेल तेलाने केसांना मसाज करणे जरुरी समजते. तर तिच्या त्वचेचे सौंदर्य दही आणि हळदीच्या फेसपॅकमुळे तेजाळलेले आहे.

अनुष्का शर्मा

प्रियंकाला केसांसाठी खोबरेल तेल उत्तम परिणामकारक वाटते, तर अनुष्कासाठी खोबरेल तेल त्वचेचे टॉनिक आहे. या व्यतिरिक्त स्मॅश केलेलं केळं ती नियमितपणे आपल्या चेहऱ्यास लावते. यामुळे त्वचेस अधिक ग्लो येतो असं ती मानते.

ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्याचा सौंदर्य मंत्र आहे भरपूर पाणी पिणे. स्वतःला रिलॅक्स करण्यापूर्वी ती आपल्या त्वचेच्या रिलॅक्सेशनवर भर देते. भरपूर पाणी पिते आणि स्वतःला तणावमुक्त ठेवते. या व्यतिरिक्त दररोज ती आपल्या चेहऱ्यास काकडीचा रस लावते. हे तिच्या सौंदर्याचं गुपित आहे.

कतरीना कैफ

सौंदर्यासाठी स्वतःला हायड्रेटेड ठेवायचं, हा नियम कतरिना न चुकता पाळते. त्वचेच्या सौंदर्यासाठी कतरिना भरपूर पाणी पिते आणि त्वचेस मॉइश्चराइज करायला बिलकूल विसरत नाही. मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करणे गरजेचं आहे, असे ती मानते. या व्यतिरिक्त सूर्यप्रकाशापासून त्वचेचे स्वरंक्षण करण्याकरिता ती नियमितपणे सनस्क्रीन वापरते.

आलिया भट्ट

पुरेशी झोप हे आलियाच्या सौंदर्याचं रहस्य आहे. ती दररोज ७ ते ८ तास झोप घेते. त्वचेच्या सौंदर्यासाठी शांत झोप अतिशय आवश्यक आहे, असे ती मानते. या व्यतिरिक्त ती आपली मल्टी व्हिटामिन्स घ्यायला विसरत नाही.

करीना कपूर

करीनाच्या सौंदर्याचा फंडा बोले तो स्वतःला हायड्रेटेड ठेवणे. त्यासाठी ज्यूस पिण्यापेक्षा ती नैसर्गिक पाणी पिणेच पसंत करते. दिवसभर कमीत कमी चार लीटर पाणी पिण्याचा ती प्रयत्न करते.

मलायका अरोरा

वयाच्या ४७व्या वर्षी देखील तरुण अभिनेत्रींच्या सौंदर्यास आव्हान देणारी मलायका आपल्या दिवसाची सुरुवात कोमट लिंबू पाणी पिऊन करते. त्यामुळे तिचे शरीर डिटॉक्सीफाय होते, असे ती म्हणते. ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर तेज दिसून येते. या व्यतिरिक्त ती ताजी कोरफड जेली लावते. तिच्या रोजच्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये बहुतांशी गोष्टी या स्वयंपाकघरातील असतात.

काजोल

काजोलची सुंदरता देखील तिच्या वयासोबत अधिकाधिक तेजाळत आहे. याचं गुपित सांगताना ती म्हणते की, ती कधीही मेकअपसह झोपत नाही. झोपण्यापूर्वी ती आपला मेकअप काढण्यास विसरत नाही. याशिवाय त्वचेच्या रोजच्या देखभालीसाठी ती क्लिन्जिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग न चुकता करते.

माधुरी दीक्षित

जीवनात शिस्त पाळणे हे माधुरीच्या सौंदर्याचं रहस्य आहे. नियमित व्यायाम – योग आणि सकस आहार यामुळे आपलं शरीरच नव्हे तर मनही सुंदर बनतं असं या अभिनेत्रीचं मानणं आहे.