प्रियंका चोप्रासंबंधित हे वाद होते चर्चेत (From...

प्रियंका चोप्रासंबंधित हे वाद होते चर्चेत (From Age Gap to Being Money Minded, Priyanka Chopra Came in Headlines due to These Controversies)

देसीगर्ल प्रियांका चोप्रा एक ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत तिचे चाहते पसरले आहेत. प्रियांका आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 1 डिसेंबर 2018 रोजी लग्न केले होते, आता दोघेही एका मुलीचे पालक झाले आहेत. प्रियांका चोप्राचे नाव निक जोनासच्या आधी बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले होते, परंतु तिच्या अफेअर्सशिवाय प्रियांका इतरही अनेक गोष्टींमुळे वादात सापडली होती.

 लग्नानंतर लगेचच, प्रियांका चोप्रा एक मनी माइंडेड सेलिब्रिटी आहे असा एक लेख लिहिला गेला होता. त्या लेखात प्रियंकाने आपल्या करीअरच्या कारकिर्दीतील एक मोठे वळण म्हणून निक जोनासशी लग्न केले असे लिहिले होते. या लेखामुळे प्रियांका चोप्रा खूप चर्चेत आली होती. पण जेव्हा वाद वाढला तेव्हा प्रियांकाचे सासरे, जो जोनास आणि सोफी टर्नर यांनी त्या लेखासाठी लेखकावर टीका करत त्याला घृणास्पद आणि अन्यायकारक म्हटले.

जेव्हा प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या डेटिंगच्या बातम्या मीडियामध्ये आल्या, तेव्हा अभिनेत्रीला त्यांच्यातील वयाच्या अंतरासाठी खूप ट्रोल केले गेले. प्रियांका आणि निक त्यांच्या वयातील फरकामुळे नेहमीच ट्रोल झाले आहेत. वयातील अंतराबद्दल बोलताना प्रियंका एकदा म्हणाली होती की, मला खरोखर आश्चर्य वाटते की मुलगा मोठा असला की कोणीही काळजी घेत नाही आणि लोकांना ते आवडते, परंतु जर मुलगी मोठी असेल तर ते चालत नाही.

काही काळापूर्वी प्रियांका चोप्राने जोनास हे नाव आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून काढून टाकले होते, त्यामुळे प्रियांका आणि निकमध्ये काहीतरी बिनसले असून ते वेगळे होणार आहेत असा समज लोकांनी केला होता. यानंतर, अभिनेत्रीने ई-टाइम्सला सांगितले की माझे युजरनेम माझ्या ट्विटर हँडलशी जुळते असावे अशी माझी इच्छा होती त्यामुळे मी तसे केले पण लोक या गोष्टीचा एवढा मोठा वाद निर्माण करतील असे मला वाटले नव्हते.

निक जोनासच्या आधी प्रियांका चोप्राही शाहरुख खान आणि अक्षय कुमारसोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत होती. ‘डॉन’ आणि ‘डॉन 2’ सारख्या चित्रपटात काम करताना शाहरुख आणि प्रियंका यांच्यात जवळीक वाढली होती, जेव्हा गौरी खानला याची माहिती मिळाली तेव्हा तिने यावर आक्षेप घेतला होता. तसेच अक्षय कुमारच्या अफेअरची बातमी ट्विंकल खन्नापर्यंत पोहोचल्यावर तिने अक्षयला प्रियंकासोबत काम करण्यास पूर्णपणे बंदी घातली असे म्हटले जाते.

इतकंच नाही तर करीना कपूर खान आणि प्रियांका चोप्रा यांच्यातील कॅट फाईट सगळ्यांनाच माहिती आहे. एकदा करीना कपूरने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये प्रियांकाच्या उच्चारणाविषयी सांगितले होते की मला आश्चर्य वाटते की प्रियंकाला इतके उच्चार कुठून येतात, याचे उत्तरात प्रियांकाने सांगितलेले की मला तिथून इतके उच्चार मिळतात, जिथून तुझा प्रियकर म्हणजेच सैफ अली. खान आणतो.