चित्रपटांमधून रिप्लेस केल्यामुळे दुखावल्या होत्...

चित्रपटांमधून रिप्लेस केल्यामुळे दुखावल्या होत्या या कलाकारांच्या भावना (From Abhishek Bachchan to Priyanka Chopra, When These Stars Were Replaced in Films)

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या करीअरची सुरुवात फ्लॉप चित्रपटापासून झाली पण नंतर त्यांच्या अभिनय कौशल्य आणि हुशारीमुळे ते इंडस्ट्रीतील सुपरस्टार झाले आहेत. वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक कलाकारांनी आपली फी वाढवली, तर काहींनी चित्रपट साइन करण्यापूर्वी आपल्या अटी घातल्या, त्यामुळे त्यांना काही चित्रपटातून बाहेरचा रस्ताही दाखवण्यात आला होता. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना शेवटच्या क्षणी त्यांची भूमिका दुसऱ्या कोणाला तरी देण्यात आल्याचे सांगितले गेले आहे. 

प्रियंका चोप्रा

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत प्रेक्षकांना वेड लावणारी देसी गर्ल प्रियांका चोप्राने तिला दोनदा चित्रपटांमधून रिप्लेस करण्यात आल्याचे सांगितले होते. प्रियांकाने सांगितले होते की, मला चित्रपटातून अचानक वगळण्यात आल्यानंतर एका अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडला ती भूमिका ऑफर करण्यात आली होती.

अभिषेक बच्चन

बॉलिवूडचे ज्युनियर बच्चन म्हणजेच अभिषेक बच्चनला सुद्धा अनेकदा चित्रपटातून काढून टाकले होते. खुद्द अभिनेत्यानेही याचा खुलासा केला होता. अभिषेकला शूटिंगसाठी सेटवर पोहोचल्यानंतर समजले होते की चित्रपटात आपल्या ऐवजी दुसऱ्याच कोणाला तरी घेण्यात आले आहे आणि ते समजल्यानंतर अभिनेता शांतपणे सेटवरून निघून गेला होता.

करीना कपूर

बॉलिवूडची बेबो करीना कपूरने एकापेक्षा एक अशा हिट चित्रपटांमध्ये काम केले असल्यामुळे इंडस्ट्रीतील सुपरस्टार्समध्ये तिचे नाव घेतले जाते. एके काळी करीनालाही अचानक चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार करीनाने दिग्दर्शकाकडे जास्त फीची मागणी केल्यामुळे तिला चित्रपटातून हाकलण्यात आल्याचे बोलले जाते.

राजकुमार राव

इंडस्ट्रीतील हुशार अभिनेत्यांपैकी एक असलेल्या राजकुमार रावची सुद्धा चित्रपटांमध्ये रिप्लेसमेंट करण्यात आली होती. राजकुमार अशा गोष्टी कधीच मनावर घेत नाही. त्याने एका मुलाखतीत म्हटले होते की, माझ्याकडून चित्रपटातील भूमिका कोणी हिसकावून घेत असले तरी मला काम करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

तापसी पन्नू

आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री तापसी पन्नूलाही चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. एका मुलाखतीत तापसीने सांगितले होते की, एकदा एका हिरोच्या पत्नीच्या आक्षेपामुळे मला चित्रपटातून बाहेर काढण्यात आले होते.