आमिर खानपासून ते सलमान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी...

आमिर खानपासून ते सलमान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी पर्यंत या बॉलिवूड अभिनेत्यांनी साकारले आहे महिला पात्र (From Aamir Khan to Salman Khan, Before Nawazuddin Siddiqui, These Bollywood Actors Have Also Become Women in Films)

बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेते प्रेक्षकांकडून आपले कौतुक व्हावे यासाठी एखाद्या पात्राला चित्रपटामध्ये जिवंत करण्यासाठी कठोर परिश्रम घेतात. चित्रपटांमध्ये आघाडीच्या अभिनेत्री असतात मात्र अनेकवेळा कलाकारांना पटकथेच्या मागणीनुसार महिलांच्या भूमिका कराव्या लागतात. अलीकडेच, नवाजुद्दीन सिद्दीकीचा एक फोटो व्हायरल झाल्यानंतर, त्याआधी कोणत्या कलाकारांनी चित्रपटांमध्ये महिलांच्या भूमिका केल्या आहेत याची बरीच चर्चा होत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी, आमिर खानपासून सलमान खानपर्यंत बॉलिवूड चित्रपटांमध्ये स्त्री भूमिका करणाऱ्या कलाकारांवर एक नजर टाकूया…

नवाजुद्दीन सिद्दीकी

नुकतेच नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘हड्डी’ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले. त्यामध्ये नवाज एका महिलेच्या भूमिकेत दिसत आहे. याआधी त्याने कधीही अशी भूमिका साकारली नसली तरी त्याच्या या नव्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अमिताभ बच्चन

बॉलिवूड़चे मेगास्टार अमिताभ बच्चन देखील चित्रपटात एका महिलेच्या भूमिकेत दिसले होते. ‘लावारीस’ चित्रपटातील मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है या गाण्यासाठी अमिताभ यांनी एका स्त्रीची वेशभूषा केली होती. चित्रपटातील अमिताभ यांचा लूक सर्वांनाच आवडला होता.

आमिर खान

आमिर खानने ‘बाजी’ चित्रपटातील एका गाण्यात महिलेची वेशभूषा केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नसला तरी चित्रपटातील आमिरचा हा लूक प्रेक्षकांना खूप आवडला होता.

सलमान खान

बॉलिवूडचा बजरंगी भाईजान सलमान खानही ‘स्वीटहार्ट’ चित्रपटात एका महिलेच्या भूमिकेत दिसला होता. पण हा चित्रपट किंवा सलमानचा महिलेच्या वेशभूषेतील लूक प्रेक्षकांच्या मनात जागा तयार करु शकला नाही.

सैफ अली खान

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान ‘हमशकल्स’ चित्रपटात मुलीच्या वेशभूषेत दिसला होता. पण या चित्रपटात सैफने साकारलेले स्त्री पात्र प्रेक्षकांना आवडले नाही. एवढेच नाही तर बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला.

रितेश देशमुख

अभिनेता रितेश देशमुखही चित्रपटात आपली भूमिका साकारण्यासाठी एकदा स्त्री बनला आहे. ‘अपना सपना मनी मनी’ या चित्रपटात रितेशने सोनिया नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. त्याचा फिमेल लूक प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.

श्रेयस तळपदे

 अभिनेता श्रेयस तळपदेसुद्धा चित्रपटात महिलेच्या भूमिकेत दिसला आहे. ‘पेइंग गेस्ट’ या चित्रपटात श्रेयसने एका महिलेची भूमिका साकारली होती. मात्र तो आपल्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकू शकला नाही आणि हा चित्रपटही फ्लॉप ठरला.

गोविंदा

बॉलिवूडचा ‘हिरो नंबर वन’ गोविंदा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तिरेखांमध्ये दिसला आहे. ‘आंटी नंबर वन’ या चित्रपटात गोविंदाने एका महिलेची भूमिका साकारून सर्वांची मने जिंकली होती. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.