पाणीपुरीवाल्याने 50 हजार रुपयांची पाणीपुरी, लोक...

पाणीपुरीवाल्याने 50 हजार रुपयांची पाणीपुरी, लोकांना फुकट वाटली. (A Vendor Distributed Free Pani Puri Worth Rs. 50 Thousands to People)

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ शहरात अलिकडेच एका पाणीपुरीवाल्याने मोठा हंगामा केला. आपल्याला मुलगी झाली, या आनंदात त्याने 50 हजार रुपयांची पाणीपुरी लोकांना मोफत वाटली.
एका दिवसात हा अजब प्रकार कोलार विभागातील बिमा कुंज रोड वर घडला. आंचल गुप्ता नावाच्या 28 वर्षीय तरुण पाणीपुरी विक्रेत्याने एकाच दिवसात, शेकडो लोकांना आपली पाणीपुरी मोफत खायला घातली.

 Free Pani Puri

या आंचल गुप्ताला मुलगी झाली, याचा त्याला खूप आनंद झाला. पण काही प्रतिगामी, कर्मठ लोकांनी त्याला नाके मुरडली. मुलगी म्हणजे तुझा खूप खर्च होणार, पुढे लग्नात मोठा हुंडा द्यावा लागणार, वगैरे गोष्टी त्याला सुनावल्या. याचा त्याला राग आला. कारण मुलगा-मुलगी यामध्ये भेदाभेद करु नये, या मताचा तो आहे. “मला मुलगी झाली, याचा मला मोठा अभिमान आहे”, अशी भावना व्यक्त करुन आंचलने हा संदेश लोकांपर्यंत पोहचविण्याचा विडा उचलला. आणि हे पाणीपुरी फुकट वाटण्याचे तंत्र अवलंबिले.

 Free Pani Puri


शेकडो लोकांनी आंचलच्या पाणीपुरीचा आस्वाद घेतला आणि कारण कळल्यावर
त्याचे अभिनंदन केले.