‘फोर मोर शॉट्स’ फेम मानवी गागरुने कॉमेडियन कुमा...

‘फोर मोर शॉट्स’ फेम मानवी गागरुने कॉमेडियन कुमार वरुणसोबत बांधली लग्नगाठ (‘Four More Shots Please’ Fame Maanvi Gagroo Ties The Knot With Kumar Varun, See Wedding Photos)

अभिनेत्री मानवी गागरुने आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केल्याचा आनंद सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. मानवीने नुकतेच आपल्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मानवी गागरूने स्टँड-अप कॉमेडियन कुमार वरुणसोबत लग्नगाठ बांधली आहे.

वेगवेगळ्या वेब सिरीजमध्ये दिसलेली अभिनेत्री मानवी गागरु आणि स्टँडअप कॉमेडियन कुमार वरुण यांनी लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अभिनेत्रीने जानेवारीत महिन्यातच लग्नाची घोषणा केली होती. घोषणेनंतर अवघ्या काही आठवड्यातच या दोघांनी लग्न केले.

विवाहसोहळ्यानंतर मानवी आणि कुमार यांनी आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. शेअर केलेल्या फोटोंमध्ये वधू लाल रंगाची साडी नेसून अतिशय सुंदर दिसत आहे. तर नवरदेव कुमार वरुण पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये राजबिंडा दिसत आहे.

लग्नाचे फोटो शेअर करत जोडप्याने लिहिले – आज, या खास तारखेला, 23 फेब्रुवारी रोजी, कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत, आम्ही लग्न केले. तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप प्रेम आणि पाठिंबा दिला आहे. आम्ही आमच्या आयुष्याची नवी इनिंग सुरू करत आहोत. तुमचे प्रेम असेच शेअर करत रहा. #2323 #KGotVi च्या शुभेच्छा.”

सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या मित्रांनी या जोडप्याला लग्नासाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. अनेक सेलेब्स नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देत आहेत.

‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ या वेबसिरीजच्या लेखिका इशिता मोईत्राने अभिनंदन करत लिहिले- “अभिनंदन माझ्या प्रिये. तुम्हा दोघांना फक्त शुभेच्छा. हिना खानने या जोडप्याला शुभेच्छा देताना खूप खूप अभिनंदन, प्रेम आणि आशीर्वाद असे लिहिले आहे. तर मौनी रॉय म्हणाली, “तुम्हा दोघांना नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी शुभेच्छा.”

याशिवाय मल्लिका दुआ, सयानी गुप्ता, गौहर खान, अभिषेक बॅनर्जी, कोंकणा सेन शर्मा, कुब्बरा सैत, सृती झा, जितेंद्र कुमार यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या.