मासे घरात सद्भाग्य आणतात (Fortune Fetcher Fengs...

मासे घरात सद्भाग्य आणतात (Fortune Fetcher Fengshui Fish)

घरात मोठा फिश अ‍ॅक्वेरियम असावा का? अ‍ॅक्वेरियम कोणत्या दिशेला असावा?
घरात फिश अ‍ॅक्वेरियम उत्तर दिशेला असावा. उत्तर दिशा ही पाण्याची दिशा असून धन-संपत्तीचे द्योतक आहे. उद्योगधंद्यात यश व भरभराटी येण्यासाठी फिश टँक ठेवावा. त्यात आठ गोल्ड व एक ब्लॅक फिश ठेवावा किंवा फेंगशुई मासा म्हणून ओळखला जाणारा ’अरवाना फिश’त्यात ठेवावा. जिवंत मासे सुद्धा घरात सद्भाग्य आणतात. यामुळे घरातील वातावरणात शुभ लहरींची वाढ होते.

आम्ही घरी नवीन फर्निचर बनवत आहोत. फेंगशुईनुसार घरातील फर्निचर कसं असावं, याबाबत माहिती द्या?
घरातील व बैठकीच्या जागेतील फर्निचर व्यवस्था व रंगसंगती पाहुण्यांना तसेच घरातील मालकाला सुरक्षित व आरामदायी असली पाहिजे. फर्निचरला कोपरे (टोक) असू नयेत. त्याला थोडा गोल (बोथट) असा आकार द्यावा. कारण टोकदार कोपर्‍यांतून अशुभ लहरी बाहेर पडतात. ज्या आपल्याला घातक ठरू शकतात. तुमच्या कुआ नंबरप्रमाणे तुम्ही ज्या दिशेच्या व्यक्ती आहात (पूर्व किंवा पश्चिम) त्यानुसार दिलेले आकार तुमच्या फर्निचरमध्ये (लहरींचे किंवा भूमितीचे आकार) असतील तर त्यांचा तुम्हाला अधिक फायदा जाणवेल. तुमच्या तत्त्वानुसार (धातू किंवा लाकूड) घरातील फर्निचर असावे. यामुळे तुमच्या यशात भर पडेल. फर्निचरचे रंग तुमच्या कुआ नंबरशी मिळते-जुळते असावे.

घराच्या मुख्य दरवाजाला अथवा त्याच्यावर बाहेरील बाजूस आरसे लावले जातात, याचे काही मुख्य कारण आहे का?
घराच्या समोर एखादी उंच इमारत, विजेचे खांब, मोठे झाड, दरवाजाच्या बाजूला लागूनच लिफ्ट वगैरे असल्यास नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत असते. कुठल्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेला घरात येण्यापासून रोखण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजाच्या वर बाहेरील बाजूस पा-कुआ मिरर (आरसा) लावावा. यामुळे वाईट लहरी बाहेरच अडवल्या जातात.

आम्ही घराचे नूतनीकरण करीत आहोत. हॉलमधील बीममुळे इंटिरिअरचे काम कसे करावे हे कळत नाही. कृपया फेंगशुईनुसार योग्य सल्ला द्या.
हॉलमध्ये उभे बीम असतील तर त्यास लाकडी कलाकुसरीने झाकून घ्या. ज्यामुळे एक आकर्षक खांब असल्याचा भास तयार होईल. आडवे बीम असल्यास (छप्पराला) प्लास्टर ऑफ पॅरिसने सिलींग करून घ्या. पण त्यावर आठवणीने एल शेप पिरॅमिड चिप बसवून घ्या. कारण बीममुळे नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते आणि हॉलमध्ये बीम असल्यामुळे व हॉलमध्ये आपला वावर जास्त असल्यामुळे ही नकारात्मक ऊर्जा आपल्याला बाधू शकते. एल शेप पिरॅमिड चिपमुळे ही त्रुटी काढता येते.

गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवा (How To Regain Self-Confidence?)