बिग बॉस 16 साठी सलमानने मागितलेल्या मानधनात 5 व...

बिग बॉस 16 साठी सलमानने मागितलेल्या मानधनात 5 वेळा बाहुबली तयार होईल ( For Big Boss Season 16 , Salman Khan Demanded Such A Huge Amount , That 5 Bahubali Type Films Can Be Made In This Budget )

भारतातील वादग्रस्त आणि बहुचर्चित अशा सर्वाधिक टीआरपी असलेल्या बिग बॉस शो चा 16 वा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. इतकी वर्षे या शोच्या सूत्रसंचालनाचे  काम सलमान खान करत आहे. या वर्षीही शोचे सूत्रसंचालन सलमानच करणार असून त्याने त्याचे मानधन वाढवले आहे. सलमानने मागितलेले मानधन ऐकून शोच्या निर्मात्यांना घाम फुटायची वेळ आली आहे. सलमानने मागितलेल्या मानधनात 5 वेळा बाहुबली सारखे बिग बजेट चित्रपट तयार होतील असे म्हटले जाते.

सलमान खान असल्यामुळे या शोचा टीआरपी नेहमीच पहिल्या क्रमांकावर असतो. या आधी बिग बॉसच्या पहिल्या सीजनच्या सूत्रसंचालनाचे काम अभिनेता अर्शद वारसीने केले होते. त्यानंतर दुसरे सीजन शिल्पा शेट्टीने केले होते. तर अमिताभ बच्चन यांनी तिसऱ्या सीजनचे सूत्रसंचालन केले होते. पण सीजन 4 पासून सलमानने सूत्रसंचालनाचे काम सांभाळण्यास सुरुवात केली तेव्हापासून मात्र या शोची लोकप्रियता वाढतच गेली. पुढे सीजन 5 मध्ये संजय दत्तकडे सूत्रसंचालनाचे काम सोपवण्यात आले होते. मात्र प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शोच्या मध्येच सलमान खानला परत बोलवण्यात आले. तेव्हा पासून पुढचे सगळे सीजन सलमान खाननेच सांभाळले.

मिळालेल्या माहितीनुसार सलमान खाने बिग बॉसच्या 16 व्या सीजनसाठी त्याचे मानधन तीन पटीने वाढवले आहे. आणि निर्मात्यांनी जर ते मान्य केले नाही तर तो हा सीजन करणार नसल्याचे म्हटले जाते.

बिग बॉस 15 साठी सलमानने 350 कोटी रुपये मानधन घेतले होते. आता त्याने त्याची फी तिप्पट वाढवली आहे. म्हणजेच नव्या सीजनसाठी सलमान 1050 कोटी रुपयांची मागणी करत आहे. त्याची ही मागणी पूर्ण झाल्यास सलमान या जगातील सर्वात महागडा अभिनेता होईल. विशेष म्हणजे हॉलिवूड कलाकारांना देखील कोणत्याच शोसाठी एवढे मानधन मिळत नाही.