वास्तुनियमांचा वापर करा, घरातील ऊर्जा वाढवा (Fo...

वास्तुनियमांचा वापर करा, घरातील ऊर्जा वाढवा (Follow Vaastu Rules For Happines)


आपल्या वास्तूवर केवळ घरातीलच नव्हे तर घराबाहेरील घटक उदाहरणार्थ रस्ते, त्यांची वळणं, फुलझाडे इत्यादी देखील शुभ-अशुभ परिणाम करत असतात. याबाबत अधिक माहिती या लेखात जाणून घेऊया-
आपल्या वास्तूच्या आजूबाजूला असणारे रस्ते, त्यांची वळणं कोणत्या दिशेला आहेत व त्याचे आपल्या वास्तूवर काय परिणाम होतात हे आपण या लेखात पाहूया.
घराच्या पूर्वेकडून उत्तरेकडे वळसा घालून जाणारा रस्ता आर्थिक अडचणी निर्माण करतो.
घराच्या पूर्वेकडून दक्षिणेकडे वळसा घालून जाणारा रस्ता घरात सतत संघर्ष निर्माण करतो.
दक्षिणेकडून पश्चिमेकडे वळसा घालून जाणारा रस्ता आयुष्य खडतर बनवतो.
उत्तरेकडून पश्चिमेकडे वळसा घालून जाणारा रस्ता प्रकृती स्वास्थ्य बिघडवतो. घरात सतत ताणतणाव निर्माण होतात.
वास्तूच्या आजूबाजूला कोणती झाडे आणि फुलझाडे लावावीत? कोणते झाड कुठल्या दिशेला असल्यास शुभ-अशुभ फळ देतात ते पाहूया.
घराजवळ चंपा, चमेली, गुलाब, केतकी ही फुलझाडे लावल्यास शुभ फळं मिळतात.
घराच्या आग्नेय दिशेला लाल फुलं असलेली झाडे त्रासदायक असतात. घराभोवती काटेरी कुंपण असू नये.
आग्नेय आणि उत्तरेला औदुंबर लावल्यास अशुभ फळे देतात.
पश्चिमेला वटवृक्ष लावल्यास त्यातून मानसिक त्रास होतो.
पूर्वेला वटवृक्ष लावल्यास शुभ असते.
पश्चिमेला पिंपळ लावणे शुभ असते.
दक्षिणेला औदुंबर लावल्यास शुभ असते.
उत्तर दिशेला पाकर लावल्यास शुभ असते.
नारळ, फणस कोणत्याही दिशेला शुभ फळे देतात,
चंपा, डाळिंब, शमी, बेल, अशोक, नागकेसर घराजवळ असणे शुभ.
मालती, केसर, जास्वंद घराच्या कोणत्याही दिशेला असल्यास त्यांची शुभ फळेच मिळतात.
ज्या घरात बोर, बाभळ, केळ, महाळुंग ही झाडे वाढतात. त्या घरात वृद्धी होत नाही.
घराजवळ रुईचे झाड लावल्यास आर्थिक उन्नती होत नाही.
हळद, निळंबीची झाडे घराजवळ लावल्यास संततीच्या दृष्टीने प्रतिकूल फळे देतात.
घरावर कोणत्याही वृक्षाची, झाडाची सावली असू नये.
रोगी व्यक्तीने आणून दिलेली रोपं कधीही घराजवळ लावू नये.
घरासमोर तुळस लावावी.
घरासमोर कडुलिंब लावल्यास हवेतील प्रदूषण नष्ट होते.
रोज सकाळी तुळशीला पाणी घातल्यास घरात शुद्ध हवा येते.
घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करीत राहते.
घराभोवती बागबगीचा करण्यासाठी शुभ नक्षत्र –
अश्विनी, रोहिणी, मृग, चित्रा, विशाखा, अनुराधा, शततारका, हस्त, उत्तरा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, रेवती.
घराभोवतालची झाडे कापण्यास शुभ नक्षत्र –
पुनर्वसू, अनुराधा, हस्त, उत्तराफाल्गुनी, उत्तराषाढा, स्वाती आणि श्रवण.
रविग्रह सिंह राशीत अथवा मकर राशीत असता कोणतेही झाड कापू नये.
माघ आणि भाद्रपद महिना झाडे कापण्यास शुभ.
झाडे, फुलझाडांच्या संदर्भातील ह्या वास्तुनियमांचा वापर करून आपल्या घरातील ऊर्जा वाढवून आपण त्यापासून सर्वतोपरी लाभ घेऊ शकतो.