नवरात्री दरम्यान या नियमांचे पालन करा (Follow T...

नवरात्री दरम्यान या नियमांचे पालन करा (Follow These Rules During Navratri Utsav)

घटस्थापना झाली आहे. नवरात्रीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. आई जगदंबेची, अंबाबाईची मनोभावे पूजाअर्चा करण्यात श्रद्धाळू गुंतले आहेत. काही लोकांनी ९ दिवसांचे उपवास सुरू केले आहेत. आपणही त्यापैकी एक असाल तर या १२ नीतिनियमांचे पालन करा.

जर आपण आपल्या घरी घट बसविले असतील अन्‌ त्याच्या पुढ्यात निरांजनाची वात अखंड तेवत ठेवली असेल, तर घरात कुणीतरी सदैव असलं पाहिजे. या ९ दिवसात घराला कुलूप लावून बाहेर जाऊ नका.

Image Source: freepik.com

घटस्थापना केली असेल तर सकाळ-संध्याकाळ देवीची पूजा व आरती करा. विसरू नका.

Image Source: freepik.com

देवीची पूजा व आरती झाल्यावर गोड पदार्थांचा नैवेद्य जरूर दाखवा. दररोज वेगवेगळे पदार्थ देवीला द्या.

Image Source: freepik.com

घराची साफसफाई नित्य नेमाने करा. दररोज सकाळी लवकर उठून, शुचिर्भूत होऊन व स्वच्छ कपडे (शक्यतो नवीन) घालूनच देवीची पूजा-आरती करा.

नवरात्रीच्या दिवसात काळे वस्त्र परिधान करू नका.

Image Source: freepik.com

चामड्याच्या वस्तू, उदा. बेल्ट, पर्स या अंगावर ठेवू नका. देव्हाऱ्याच्या आसपास ठेवू नका.

शक्यतोवर नवरात्रीच्या या पवित्र काळात नखे, केस कापू नका. दाढी करू नका.

घरातील वातावरण आनंदी, प्रसन्न ठेवा. या ९ दिवसात घरात भांडण-तंटा, वादविवाद यांना थार देऊ नका.

या ९ दिवसात उपवास करणे चांगले. पण ते करत नसाल तर शुद्ध, सात्विक, शाकाहारी खाद्यपदार्थ बनवा. स्वयंपाकात लसूण, कांदा या तामसी पदार्थांचा समावेश करू नका. मांस-मच्छीचा त्याग करा. मद्यपान, धूम्रपान, तंबाखू सेवन करू नका.

Image Source: freepik.com

जे लोक नवरात्रीचं कडक व्रत करत असतील, त्यांनी या दिवसात बिछान्यावर झोपू नये. सतरंजी किंवा चटई जमिनीवर टाकून, त्यावर झोपा.

देवीची पूजा करतेवेळी लक्ष विचलित होऊ देऊ नका. एकाग्रतेने, श्रद्धेने पूजा-आरती करा. दुर्गा सप्तशतीचे पठन करा.

 या दिवसात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. मन शांत, स्थिर ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. कोणालाही दुखवू नका.