दहा वेळा जेवूनही शिल्पा शेट्टी एवढी फिट कशी? पा...

दहा वेळा जेवूनही शिल्पा शेट्टी एवढी फिट कशी? पाहा व्हिडिओ (Fitness queen Shilpa Shetty’s video is viral on social media)

शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेसबाबत किती दक्षता घेते हे सर्वांनाच माहीत आहे. शिल्पाचे व्यायाम आणि योगा करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. इतकेच नाही तर शिल्पा आपल्या डाएटवर देखील प्रचंड लक्ष देते. जंक फूड शिल्पा अजिबात खात नाही. म्हणूनच बॉलिवूडची फिटनेस क्वीन म्हणून शिल्पा शेट्टीकडे पाहिले जाते.

शिल्पा शेट्टीचा फिटनेस पाहून सर्वांना तिचा हेवा वाटला तर त्यात नवल ते काय? ती दिवसभरातून नेमक्या वेळी आणि अत्यंत मोजके अन्न खात असेल, असाच तिच्याकडे पाहणाऱ्यांचा समज आहे. मात्र, नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच चकित व्हाल. कारण या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी सतत खाताना दिसत आहे. विशेष म्हणजे शिल्पा दिवसभरातून तब्बल १० वेळा जेवण करते. सर्वांना प्रश्न पडला असेल की, इतके जास्त खाऊन शिल्पा फिट कशी आहे?

त्याचं असं आहे की, शिल्पा शेट्टी दिवसभरातून जरी १० वेळा खात असली तरीही दर वेळी ती हेल्दी गोष्टी खाते. जंक फूड वगैरे अजिबाच नाही. व्हिडीओमध्ये शिल्पा विविध प्रकारची फळे आणि ड्रायफूड खाताना दिसते आहे. तेव्हा शिल्पा शेट्टीप्रमाणे फिट राहायचे असेल तर खाण्याचे टेंशन घ्यायचे नाही. कितीही खा पण हेल्दी खा आणि फिट राहा. नुसतं खायचं नाही तर ते हजम करायचं अर्थात व्यायामाची जोड हवीच.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)