कतरीना कैफचा नवरा, विकी कौशल अडचणीत : त्याच्याव...

कतरीना कैफचा नवरा, विकी कौशल अडचणीत : त्याच्यावर झाला गुन्हा दाखल (FIR Against Vicky Kaushal For Illegal Use Of Bike Number Plate)

कतरीना कैफशी अलीकडेच लग्न केल्याने अभिनेता विकी कौशल जरा जास्तच चर्चेत आला. पण आता एका कायदेशीर अडचणीत तो सापडला आहे. लग्नाची धांदल संपवून विकी शूटिंगला गेला. विकी आणि सारा अली खान इंदूरमध्ये एका चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. त्यामध्ये मोटारसायकलवर फिरत असल्याचे दृष्य या दोघांवर चित्रित करण्यात आले. त्या बाईकवर जो नंबर लावण्यात आला आहे, तो आपला असल्याचा आरोप एका इंदूरकराने लावला आहे. अन त्याने विकी विरुध्द पोलिसात एफ. आय. आर. दाखल केला आहे.

फिर्यादी जयसिंह यादव याचं असं म्हणणं आहे की, परवानगी शिवाय माझ्या स्कुटीचा नंबर वापरला गेला आहे. तो बेकायदेशीर आहे.

या महाशयाने दाखल केलेल्या तक्रारीबाबत सब-इन्स्पेक्टर राजेन्द्र  सोनी यांनी तपास सुरु केला असून नंबरचा वापर चुकीच्या हेतुने केला आहे की काय, त्याची शहानिशा करू. त्यातून तक्रार खरी ठरली तर कायदेशीर कारवाई करू. सिनेमाच्या युनिटची पण चौकशी करण्यात येईल.