अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची मुलगी वामिक...

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची मुलगी वामिकाची पहिली झलक दिसली… (Finally got the first glimpse of Anushka Sharma and Virat Kohli’s daughter Vamika)

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनच्या न्यूलँड्स येथे सुरु असलेल्या तिसऱ्या अन्‌ शेवटच्या वनडे सामन्याच्या दरम्यान लोकांना प्रथमच विराट आणि अनुष्का यांच्या लेकीची झलक पाहावयास मिळाली. विराटचा सामना पाहण्यासाठी तसेच त्याला प्रोत्साहित करण्यासाठी मायलेकी स्टेडियममध्ये गेल्या होत्या. स्टेडिअममध्ये वामिकाला कडेवर घेऊन उभ्या असलेल्या अनुष्काला कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर सगळ्यांना वामिका पाहावयास मिळाली. वामिकाने छान गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला होता. लाल रिबिनने पोनीटेल घातलेली छोटीशी वामिका गोड दिसत होती.

वामिकाला पाहिल्यानंतर विराट आणि अनुष्का या दोघांचे चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जण ती आपल्या पप्पांवर गेली असल्याचे म्हणत आहेत तर कोणी ती तिच्या आईसारखी आहे, असे म्हणताहेत. आता काही खैर नाही, असंही काही म्हणाले. कारण विराट आणि अनुष्काने त्यांच्या मुलीचा चेहरा मीडियासमोर दाखवायचा नाही, असे बजावले असतानाही मीडियाने ऐकलं नाही… कदाचित यावर त्यांची काय प्रतिक्रिया पाहावयास मिळेल कोणास ठाऊक?

अलीकडेच ११ जानेवारीला वामिका एक वर्षांची झाली. त्यावेळेस विराट आणि अनुष्का दक्षिण आफ्रिकेला होते. त्यामुळे लेकीचा पहिला वाढदिवस त्यांनी तिथेच साजरा केला. तिच्या जन्मापासूनच दोघांनी वामिकाचा चेहरा मीडियासमोर कधीच येऊ दिला नाही. त्यांना वामिकाला प्रकाशझोतात आणायचे नाही. त्यांनी फोटोग्राफर्सना देखील तशी विनंती केली होती. त्यामुळे आपण याआधीही वामिकाचे जे फोटो पाहिले, त्यात कोठेही तिचा चेहरा दिसणार नाही याची तिच्या आईवडिलांनी पूर्णतः काळजी घेतलेली दिसते.

मात्र केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा वनडे सामना पाहण्यासाठी गेलेली अनुष्का आणि वामिका पहिल्यांदाच लोकांना दिसली. या सामन्यात माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीने ६३ चेंडूत मालिकेतील आपले दुसरे अर्धशतक झळकावले. त्यावेळेस आनंद व्यक्त करताना अनुष्कासोबत वामिकाला कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. विराटनेही आपले हे अर्धशतक आपल्या लाडक्या लेकीला समर्पित केले आहे.

विराट आणि अनुष्काच्या लेकीसोबतचे काही आनंदी क्षण पाहुयात…

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम