अखेरीस आर्यन खानला जामीन मिळाला! (Finally Aryan...

अखेरीस आर्यन खानला जामीन मिळाला! (Finally Aryan Khan Granted Bail, Detailed Order Will Be Issued Tomorrow)

गेल्या २५ दिवसांपासून क्रूझ ड्रग प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानला आज दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टाने आर्यनला जामीन मंजूर केला. आर्यनसह अरबाज मर्चंट व मुनमुन धमेचा यांना देखील जामीन मिळाला आहे.

मुंबईच्या हायकोर्टात भारताचे माजी ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यनची बाजू मांडली. ख्यातनाम ॲडव्होकेट सतीश मानेशिंदे आणि ज्येष्ठ विधीज्ञ अमित देसाई हे देखील या सुनावणीच्या वेळी हजर होते.

हायकोर्टाचे न्यायमूर्ती श्री. नितीन सांबरे यांनी आर्यनच्या जामीनाचे आदेश दिले. मात्र यासंबंधींचे सविस्तर आदेश उद्या हाती पडणार असून त्यानंतरच आर्यन खान व त्याच्या सहयोगींची तुरुंगातून सुटका होईल.