फिल्मी स्टाईल फॅशन (Film Style Fashion For Holi)

फिल्मी स्टाईल फॅशन (Film Style Fashion For Holi)

होळीला रंगांची उधळण केल्याने कपडे सप्तरंगी होत असले, तरी आपल्याला फॅशन करावीशी वाटतेच. त्यात पुन्हा फिल्मी फॅशनचा प्रभाव असल्याने तशी स्टाईल मारावीशी वाटते. तेव्हा होळीच्या निमित्ताने बना असे फॅशनेबल.
सौजन्य – ॲमेझॉन फॅशन आणि ब्युटी
मात्र यंदाच्या करोनाच्या पुन्हा आलेल्या लाटेने रंग खेळण्यावर बंधने आली आहेत. तेव्हा त्यांचे पालन करून घरच्या घरी, फार तर घराच्या अंगणात किंवा सोसायटीच्या आवारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून रंग खेळा. जमाव करून रंग उधळण करण्यापेक्षा वैयक्तीकरित्या रंगांची मौज अनुभवा.


क्लासिक व्हाईट लूक

मुलींसाठी
प्रिंटेड व्हाईट सलवार सूट
होळीसाठी एका क्लासिक व्हाईट आउटफिट इतकं परफेक्ट काहीच असू शकत नाही. संपूर्ण सफेद सलवार सूट होळीच्या रंगीबेरंगी रंगांसाठी एक आदर्श कॅनव्हास आहे. यावर चांदी वा ऑक्सडाइज्ड दागिने घातल्यास तुम्ही अधिक सुंदर दिसाल.
चांदीच्या बांगड्या – पातळ चांदीच्या बांगडया हातभर घालण्याचा सध्या ट्रेंड आहे. या चांदीच्या बांगड्या तुम्ही कोणत्याही पारंपरिक वा फ्यूजन आउटफिटसोबत मॅच करू शकता.
मॅट लिपस्टीक
एक चांगली ट्रांसफर-प्रूफ मॅट लिपस्टिक ही मेकअपचं एक उत्कृष्ट सौंदर्यप्रसाधन आहे. तुमच्या वेशभुषेला ती अधिक सुंदर बनवतेच शिवाय पूर्ण दिवस टिकते. तुम्ही लाल, गुलाबी वा जांभळ्या रंगाची निवड करू शकता.
मुलांसाठी
सफेद कुर्ता आणि पायजमा
एक पूर्ण सफेद सैलसर कुर्ता आणि पायजमा होळीसाठी एकदम उपयुक्त आहे. यामधील तुमचं लूक अधिक आकर्षक दिसण्यासाठी एक बांधणी वा सॉलिट रंगाची ओढणी त्यावर घेऊन कमाल पाहा.
कोल्हापुरी चप्पल
कोल्हापुरी चप्पलची मजबूती आणि आकर्षक डिझाइन यामुळे ती कोणत्याही पारंपरिक तसेच इंडो-वेस्टर्न कपड्यांसोबतही बिनधास्त घालता येते.
बॉडी मॉइश्चरायझर
होळीच्या रंगांपासून त्वचेचे रक्षण करण्याकरिता एक चांगला मॉइश्चरायझर सोबत असणे जरुरी आहे. पार्टीला जाण्यापूर्वी त्वचेस मॉइश्चरायझर लावून सुरक्षित करा.

कॅज्युअली चिक

मुलींसाठी
सॉलिड शर्ट – आपल्या आवडीच्या डेनिम शॉर्टसोबत एक सॉलिड रंगाचा शर्ट निवडा. आपल्या आउटफीटला फिल्मी टच देण्यासाठी तुम्ही शर्टला मध्ये गाठ देऊ शकता.
डेनिम शॉर्ट – ह्या होळीला तुम्हाला पारंपरिक कपडे घालावयाचे नसल्यास तुम्ही डेनिम शॉर्ट आणि त्यासोबत एक सॉलिड रंगाचा टॉप वा टी-शर्ट घालू शकता. मग त्यावर एक वंदना आणि फ्लिप फ्लोप्स घालून तुमच्या लूकला संपूर्णता द्या.
फ्लोरल प्रिंटेड फ्लिप फ्लोफ्स
फ्लिप फ्लोप्सशिवाय कॅज्युअली चिक अपूर्ण आहे. यामुळे चालताना आरामदायक वाटते तसेच ही कोणत्याही पारंपरिक वा एथनिक कोणत्याही कपड्यांसोबत घालता येते.
हेअर मास्क
होळीच्या रंगांमुळे केसांचे नुकसान होऊ नये यासाठी एक चांगला हेअरमास्क तेलासोबत केसांना लावून घ्या.
मुलांसाठी
चेकशर्ट – डेनिमसोबत चेक्सचे शर्ट घाला आणि कॅज्युअल राहूनही मॉर्डन दिसा. या पेहरावातील लूक पूर्ण करण्यासाठी फ्लिप एविएटस्‌चा वापर करा.
प्रिंटेड बंदना : प्रिंटेड बंदनासोबत आपल्या स्टाईलला आणखी आकर्षक बनवा. या एक्सेसरीज मुळे तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे दिसाल तसेच तुमच्या केसांचे रंगांमुळे होणारे नुकसान टळेल.
टिंटेड एविएटर्स: सनग्लासेसमुळे तुमच्या वेशभुषेला अधिक ग्लॅमरस लूक येईल. टिंटेड लेससोबत एका क्लासिक एविएटरची निवड करा आणि स्टाईलिश दिसण्याबरोबरच आपले डोळेही सुरक्षित ठेवा.
मस्क डियोडोरेंट्स : एक मधुर सुगंध असलेला डिओ लावायला विसरू नका. मस्तीच्या सुगंधामध्ये या डिओचा सुगंध एकत्र होऊन एक वेगळीच अनुभूती घ्या.


पारंपरिक स्टाईल

मुलींसाठी
मल्टी – कलर्ड लहंगाचोली :मल्टी कलर्डच्या लेहंगाचोली घातल्यानंतर आपोआपच एक स्टाईलिश लूक मिळतो. त्यासाठी वेगळं काही करण्याची गरज पडत नाही. यातील आपलं सौंदर्य खुलविण्यासाठी काही चंकी ऑक्सडाईज्ड दागिने घाला.
वाटरप्रूफ लिक्विड आयलायनर : आयलायनरशिवाय सौंदर्य अपूर्ण आहे. होळी साठी तयार होताना तुम्ही ब्लॅक, ग्रीन आणि ब्लू वॉटरप्रूफ लिक्विड आयलायनरचा वापर करा.
चंकी ऑक्सडाईज्ड ज्वेलरी : तुमच्याकडे तयार होण्यासाठी वेळ कमी असेल तर साध्या आउटफिटवर चंकी  ऑक्सडाईज्ड ज्वेलरी घाला. केवळ भारतीयच नाही तर एथिनिक वेशभूषेवरही ही ज्वेलरी चार चाँद लावते.  
मुलांसाठी
नेहरू जॅकेट : हे जॅकेट कुर्ता-पायजमा, जोधपुरी पँट, चिनोज, जिन्ससोबतही घालता येते. यास एक शानदार स्टाईलचे लूक हवे असल्यास हे जॅकेट प्लेन कलरवर वापरून बघा.
सॉलिड कलर्ड धोती-पँट : धोती-पँट हा अतिशय आरामदायक पेहराव आहे. होळीच्या पार्टीसाठी एक परफेक्ट एथनिक लूक यामुळे मिळतो, यासोबत पठानी वा सिमेट्रीक कुर्त्यासोबत घाला.
मॅटी फाईंग सनस्क्रीन – होळीचे रंग आणि सूर्यकिरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी घरातून बाहेर पड्याआधी  २० मिनिटं अगोदर सनक्रिन लावा. चांगल्या परिणामासाठी २० पेक्षा जास्त एसपीएस असलेले सनस्क्रीन लावा.
मग यावर्षीची होळी फिल्मी स्टाईलमध्ये ना?

पुरुषांच्या इंद्रियावर कमेंट करून दिया मिर्झाने माजवली खळबळ… (Dia Mirza’s Comment On Mens Private Part; People Surprised By Tweet)