सिनेकलाकारांनी पारंपरिक पद्धतीने साजरा केला गुढ...

सिनेकलाकारांनी पारंपरिक पद्धतीने साजरा केला गुढीपाडवा; चाहत्यांना दिल्या शुभेच्छा (Film Stars Celebrate Gudhipadwa Festival In Traditional Style; Wishes Fans)

हिंदू नव वर्षाचा आरंभ आणि चैत्र नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर चित्रसृष्टीतील अभिनेत्रींचा सुंदर असा पारंपरिक पेहराव पाहावयास मिळाला. या अभिनेत्रींनी आपल्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत पारंपरिक अंदाजातील आपले फोटो शेअर केले. हिंदू सण आणि त्यांच्याशी निगडीत परंपरांचं औचित्य साधून कंगना नेहमीच आपल्या सोशल अकाऊंटवर पोस्ट टाकत असते. आजही गुढीपाडव्याच्या निमित्ताने कंगनाने आपले फोटो शेअर करून सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

बॉलीवुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोलही धुमधडाक्यात चैत्र नवरात्र साजरी करते. काजोलने एकदम मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने डोक्यावर पदर घेऊन सगळ्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काजोलचा असा मराठमोळा अवतार ‘तान्हाजी; द अनसंग वारियर’ या चित्रपटामध्ये दिसला होता.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

हल्लीच करोनाची लागण झालेली भूमि पेडणेकरने देखील मराठी अंदाजात आपल्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पारंपरिक मराठी वेशभुषेमध्ये भूमि अतिशय सुंदर दिसत आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील आपल्या आईसोबत पूर्णतः पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा सण साजरा केला असून त्याचे फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. फोटो

सौजन्य : इंस्टाग्राम

अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्राने आपल्या घरी चैत्र नवरात्रीची घटस्थापना केली आहे आणि पारंपरिक पद्धतीने पुजापाठ करत लोकांना नवरात्र आणि पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या अतिशय कठीण काळ सुरु आहे, तेव्हा देवीच्या आशीर्वादाने सगळ्यांना निरोगी आयुष्य लाभो, अशी कामना तिने केली आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

अभिनेता शरद केळकरने आपल्या मुलीसोबत गुढी उभारून तिची पुजा केली आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम काही सिनेकलाकारांनी आपला फोटो प्रसिद्ध न करता चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या आवडत्या कलाकारांचा पारंपरिक लूक पाहून चाहत्यांनीही आनंद व्यक्त करत कलाकारांनाही अनेक शुभेच्छा दिल्या आहेत.