निर्मात्यांना बेजार करणारे अभिनेत्रींचे नखरे : ...

निर्मात्यांना बेजार करणारे अभिनेत्रींचे नखरे : चित्रपटाचा करार करताना घालतात विचित्र अटी (Film Makers Get Upset With The Tantrums Of These Heroines : Keep Such Demands Before Signing A Film)

रुपेरी पडद्यावर आपल्या अदाकारीने रसिकांची मने जिंकणाऱ्या, कधी साधीभोळी तर कधी ग्लॅमरस असे रूप दाखविणाऱ्या अभिनेत्री प्रत्यक्ष जीवनात कशा वागतात, या बद्दल चाहत्यांना उत्सुकता असते. पण ते जाणून न घेणं, हेच बरं असं त्यांच्या बाबतीत म्हणावं लागेल. कारण येथील काही अभिनेत्री पडद्यामागे इतके नखरे करतात की, निर्माते बेजार होऊन जातात. सिनेमाचा करार करताना त्या विचित्र अटी घालतात…


कंगना रणावत :
याबाबत कंगना रणावतचा पहिला नंबर लागतो. ती आपलं काम चोख करते याबद्दल वाद नाही. पण चित्रपटाचा करार करताना तिची आत असते की, माझी ठरलेली रक्कम पूर्ण मिळाल्याशिवाय तुम्ही हा चित्रपट प्रदर्शित करू शकणार नाही.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

करीना कपूर खान :
चित्रपटाचा करार करताना करीनाची अट असते की, ती चुंबन दृश्य देणार नाही. तसेच सेक्सी सीन देणार नाही.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

प्रियांका चोप्रा
सुरुवातीला चित्रपटात कोणतीही दृश्ये देण्यास प्रियांका कचरत नव्हती. पण ती अमेरिकेत पोहचली अन ग्लोबल स्टार होताच तिला पंख फुटले. आपण चित्रपटात कोणत्याही प्रकारचे नग्न दृश्य देणार नाही, अशी आत घालूनच ती करार करते.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

सोनाक्षी सिन्हा :
सोनाक्षीला चुंबन दृश्ये देणे अडचणीचे वाटते, म्हणून ती, या प्रकारची दृश्ये देण्यास हरकत घेते. या अटीवरच ती करार करते.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

सनी लिओनी  :
बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सनी लिओनी तद्दन बोल्ड आणि ऍडल्ट चित्रपटांमध्ये काम करत होती. पण इथे प्रवेश केल्यावर तिची नियत बदलली. ‘मला इज्जत मिळाली पाहिजे,’ अशी ती निर्मात्यांना अट घालते. अर्थात चुंबन दृश्य मी देणार नाही, अशी तिची अट असते.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम