रोहित शेट्टीने जुहू पोलिसस्थानकात आपला वाढदिवस ...

रोहित शेट्टीने जुहू पोलिसस्थानकात आपला वाढदिवस साजरा केला (Film Maker Rohit Shetty Celebrates Birthday At Police Station, Inaugurates Juhu Beach Station, See Pics And Video)

आपल्या चित्रपटांमध्ये पोलिसांना अधिक महत्व देणारा चित्रपट निर्माता रोहित शेट्टी आज आपला ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. रोहित शेट्टीने आपला वाढदिवस मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि त्यांच्या विभागासोबत साजरा केला. आपल्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील जुहू चौपाटीलक उघडण्यात आलेल्या नवीन पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाला चित्रपट निर्माता उपस्थित होता.

चित्रपटांमध्ये धमाकेदार अ‍ॅक्शन आणि स्टंट दाखवणारा चित्रपट निर्माता रोहित शेट्टीचा आज ४९ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त मुंबईतील जुहू चौपाटीवर सुरू झालेल्या नवीन पोलिस स्टेशनच्या उद्घाटन समारंभाला तो उपस्थित राहिला.

रोहित शेट्टी आपल्या चित्रपटांमध्ये पोलिस सेवांना प्रोत्साहन देतो. त्यामुळेच रोहितवर मुंबई पोलिसांनी प्रेमाचा वर्षाव केला. जुहू बीचवर नव्याने सुरू झालेल्या पोलिस स्टेशनच्या उद्घाटन समारंभात रोहित शेट्टीलाही आमंत्रित करण्यात आले होते.

चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात शिल्पा शेट्टी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.

शिल्पानेसुद्धा रोहितला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अजय देवगणनेसुद्धा रोहितसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत शुभेच्छा दिल्या.