अभिनेता आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राज ब...

अभिनेता आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांना दोन वर्षांची शिक्षा (Film Actor And Congress leader Raj Babbar Sentenced To Two Years In Jail In 1996 Poll Code Violation Case)

चित्रपट अभिनेता आणि काँग्रेस नेता राज बब्बर (Film actor and Congress leader Raj Babbar) यांना एमपी एमएलए कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच कोर्टाने त्यांना ६५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदारांची दिशाभूल करणे आणि पोलिंग एजंटशी वाद घातल्याप्रकरणी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

२ मे १९९६ मध्ये मतदान अधिकाऱ्याने वजीरगंजमध्ये एफआयआर दाखल केला होता. राज बब्बर तेथून सपातून उमेदवार होते. मतदान अधिकाऱ्याला मारहाण करण्याच्या प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या तक्रारीनुसार, राज बब्बर हे समर्थकांसह मतदान स्थळी घुसले आणि त्यांनी मतदान प्रक्रियेत अडथळा आणला. याशिवाय ड्यूटीवर असलेल्या लोकांशी चुकीच्या पद्धतीने वागले. यादरम्यान श्रीकृष्ण सिंह राणा यांच्याशिवाय पोलिंग एजेंट शिव सिंह हेदेखील जखमी झाले होते.

वजीरगंज पोलीस ठाण्यामध्ये राज बब्बर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमपी एमएलए कोर्टानं राज यांना दोन वर्षांची शिक्षा आणि साडेसहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

बॉलीवूडमध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतील अभिनयानं राज यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. त्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये उडी घेत लोकप्रियता मिळवली. कॉग्रेसचे निष्ठावान नेते अशीही त्यांची ओळख आहे. दिल्लीच्या राजकारणात महत्वाचे स्थान असणाऱ्या राज बब्बर यांचा राजकीय प्रवास देखील मोठा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते बॉलीवूडपासून लांब असले तरी बॉलीवूडच्या महत्वाच्या सोहळ्यांना त्यांची उपस्थिती दिसून आली आहे.