लाखो महिला चाहत्यांची धडकन असलेला कार्तिक आर्यन...

लाखो महिला चाहत्यांची धडकन असलेला कार्तिक आर्यन स्वत:ला अशाप्रकारे ठेवतो फिट (Female Fans are Obsessed with Kartik Aryan’s Fitness, Know How Actor Keeps Himself Fit)

अभिनेता कार्तिक आर्यन हा फिल्म इंडस्ट्रीतील आउटसाइडर असूनही त्याने आपले स्थान पक्के केले आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर कार्तिकने बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा क्यूटनेस, हॉट स्टाइल आणि फिटनेसकडे लाखो महिला चाहत्या आकर्षित होतात. बॉलिवूडमधील सर्वात हँडसम अभिनेत्यांपैकी एक असलेला कार्तिक आर्यन स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतो. यासाठी जिममध्ये तासनतास घाम गाळण्यासोबतच तो काटेकोरपणे डाएट प्लॅन फॉलो करतो.

कार्तिक स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी रात्री उशिरा किंवा कोणत्याही वेळेत वर्कआउट करण्यास मागेपुढे पाहत नाही. मानसिक आरोग्यासाठी व्यक्तीचे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत अभिनेत्याने व्यक्त केले होते. बरेचदा कार्तिकला दिवसरात्र शूटिंग करावे लागते, तेव्हाही तो आपले वर्कआउट चुकवत नाही.

कार्तिक अनेकदा आपल्या वर्कआउटशी संबंधित फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अभिनेत्याचा मिड नाईट वर्कआउट सेल्फी त्याच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात. त्याने त्याच्या व्यायामाचे वेळापत्रक बनवून ठेवल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते.

मुलाखतीत, अभिनेत्याने असेही सांगितले होते की मला 6 पॅक अॅब्स तयार करण्यासाठी सुमारे 6 महिने लागले. मी दररोज 200 ते 300 पुशअप मारतो. सोबतच रोज 500 वेळा रशीउड्या मारणे हा माझ्या दिनचर्येचा भाग आहे. याशिवाय मी माउंटन क्लाइंबिंग, लेग क्रंच, लेग रेजिंग आणि सायकलिंगही करतो.

वर्कआउट्सव्यतिरिक्त, अभिनेता स्वतःला फिट ठेवण्यासाठी योग्य संतुलित आहार घेतो. सकाळी उठल्यावर तो कोमट पाण्यात लिंबू पिळून पितो. व्हेज डाएट घेण्यासोबतच तो आपल्या जेवणात प्रोटीनचा समावेश करायला विसरत नाही. तो दोन दोन तासांनी काहीतर खातो. दुधासह चहा किंवा कॉफीऐवजी अभिनेता ग्रीन टी पिण्यास प्राधान्य देतो. चीट डेच्या दिवशी त्याला कोणत्याही प्रकारची भाकरी खायला आवडते.

अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. सध्या कार्तिक कियारा अडवाणीसोबत ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे, हा चित्रपट पुढील वर्षी जूनमध्ये रिलीज होईल. याशिवाय कार्तिक ‘फ्रेडी’, ‘शेहजादा’ आणि ‘आशिकी 3’ यांसारख्या चित्रपटही दिसणार आहे.