आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटावर फातिमा...

आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटावर फातिमा सना शेख झाली ट्रोल (Fatima Sana Sheikh Gets Trolled After Aamir Khan And Kiran Rao’s Divorce Announcement)

आमिर खान आणि किरण राव यांनी एकमेकांपासून सामंजस्याने दूर होण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे या घटनेवर त्यांच्या उलटसुलट प्रतिक्रिया अपेक्षित होत्याच.

त्यासोबतच एक नाव सोशल मीडियावर वारंवार घेतले जात आहे. ते म्हणजे ‘दंगल’ या चित्रपटातील कलावती फातिमा सना शेख हिचं.

आमिर आणि किरण यांच्या विभक्तीला ट्रोलर्स या फातिमाला जबाबदार धरत आहेत. सोशल मीडियावर ते शंका व्यक्त करत आहेत की, दोघांचा संसार मोडायला ही फातिमा तर कारणीभूत नाही ना? यात ट्रोलर्सची पण काही चूक नाही. कारण ही तरुण कलावती आमिरच्या संपर्कात ‘दंगल’ चित्रपटापासून आली व त्यांच्यामध्ये काहीतरी शिजत असल्याची कुजबुज गेल्या काही महिन्यांपासून चालू आहे. किरणपेक्षा अधिक तरुण असलेल्या या मुलीची भुरळ आमिरला पडली असल्याची दाट शक्यता आहे. अन्‌ या तरुण मुलीला आमिर सारख्या कमालीच्या लोकप्रिय अभिनेत्याचे आकर्षण वाटणे हेही स्वाभाविक आहे.

मात्र काही महिन्यांपूर्वी याबाबतीत एका मुलाखतीत तिनं असं म्हटलं होतं की, आमीर हे माझे गुरू आहेत. मी त्यांना माझा मार्गदर्शक समजते. पण तिच्या या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून आत्ता घडलेल्या प्रकरणाबद्दल ट्रोलर्स आमिर आणि फातिमा यांच्या कथित घनिष्ट संबंधांबाबत खूपच वावड्या उठवित आहेत.

काही लोकांना तर आमिर आणि फातिमा यांचे येऊ घातलेले संबंध जास्त दिवस टिकून राहावेत, इतपत विधाने केलेली आहेत.