खऱ्या आयुष्यातील बाप-लेकाच्या या जोड्यांनी केले...

खऱ्या आयुष्यातील बाप-लेकाच्या या जोड्यांनी केले आहे चित्रपटांत एकत्र काम (Father’s Day Special : Real Life Father Son Played Reel Life Role In Films)

चित्रपटात आपल्याला अनेक नाती पाहायला मिळतात. पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांचे बॉण्डिंग पाहून त्यांचे नाते खरेच आहे की काय असेच वाटते. मग ते आई- मुलाचे असो , भाऊ-बहीणीचे किंवा वडील आणि मुलांचे. पण पडद्यावर काही खऱ्या बाप-लेकांच्या जोडीने सुद्धा अभिनय केला आहे. चला तर जाणूयात कोण आहेत या जोड्या.

विनोद खन्ना- अक्षय खन्ना

चित्रपट- हिमालय पुत्र

अभिनेता १९९७ मध्ये हिमालय पुत्र या चित्रपटातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. या चित्रपटात त्याचे वडील विनोद खन्ना सुद्धा मुख्य भूमिकेत होते. तर हेमा त्यांच्या आईच्या भूमिकेत होती.

संजय दत्त- सुनील दत्त

चित्रपट- मुन्नाभाई एमबीबीएस

२००३ मध्ये आलेल्या मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात सुनील दत्त आणि संजय दत्त या खऱ्या आयुष्यातल्या बाप-लेकाच्या जोडीने काम केले होते. या चित्रपटाच्या एका क्लायमॅक्समध्ये या दोघांच्या गळाभेटीचा सीन होता. या सीन दरम्यान दोघेजण इतके  भावूक झाले की दिग्दर्शकाने कट म्हणून सुद्धा दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारुन रडत होते.

अनिल कपूर- हर्षवर्धन कपूर

चित्रपट – थार

नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या थार या चित्रपटात अनिल कपूर यांनी त्यांचा मुलगा हर्षवर्धन कपूरसोबत काम केले आहे. या चित्रपटात अनिल कपूर यांनी पोलिसांची भूमिका साकारली आहे तर हर्षवर्धन या चित्रपटात अॅण्टीक वस्तूंची तस्करी करणारा दाखवला आहे.

धर्मेंद्र – सनी देओल – बॉबी देओल

चित्रपट- अपने , यमला पगला दिवाना

अभिनेता धर्मेंद्र त्यांच्या दोन्ही मुलांसोबत अपने आणि यमला पगला दिवाना या चित्रपटात एकत्र दिसले होते. दोन्ही चित्रपटांत त्यांनी वडील आणि मुलांची भूमिका साकारली होती. लवकरच या तिघांचा अपने २ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

पंकज कपूर आणि शाहिद कपूर

चित्रपट – जर्सी, शानदार

याच वर्षी प्रदर्शित झालेल्या जर्सी या चित्रपटात शाहिद कपूर आणि पंकज कपूर या बाप-लेकाची जोडी पहायला मिळाली. चित्रपटात पंकज यांनी शाहिदच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. चित्रपटात दोघांचे खूपच इमोशनल नाते दाखवले होते. तसेच २०१५ मध्ये शानदार या चित्रपटात पंकज यांनी शाहिदच्या गर्लफ्रेंडचे पात्र साकारणाऱ्या आलियाच्या वडीलांची भूमिका साकारली होती.

राजेंद्र कुमार- कुमार गौरव

चित्रपट- लव स्टोरी

१९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या लव स्टोरी या चित्रपटात अभिनेते राजेंद्र कुमार त्यांच्या खऱ्या मुलासोबत दिसले होते. चित्रपटात दोघांनी बाप-लेकाचा रोल केला होता. चित्रपटात दोन वेगवेगळ्या जनरेशनची प्रेम कहाणी दाखवण्यात आली होती.

ऋषि कपूर-रणबीर कपूर

चित्रपट- बेशर्म

दिवंगत अभिनेते ऋषि कपूर यांनी शानदार चित्रपटात त्यांचा मुलगा रणबीर कपूरसोबत काम केले होते. या चित्रपटात ऋषि कपूर रणबीरचे वडील तर नीतू कपूरने त्याच्या आईची भूमिका साकारली होती. हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही पण पहिल्यांदा  ऋषि-रणबीर – नीतू या रिअल कुटुंबाला रिल कुटुंब पडद्यावर साकारायला मिळालं होतं.

अमिताभ बच्चन – अभिषेक बच्चन

चित्रपट- पा, बंटी और बबली, कभी अलविदा ना कहना

बॉलिवूडमधली सगळ्यात आवडती बाप-लेकाची जोडी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन अनेक चित्रपटांत एकत्र दिसली आहे. पा या चित्रपटात तर अभिषेकने अमिताभ यांच्या वडीलांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अमिताभ यांनी ऑरो या मुलाचे पात्र साकारले होते. त्याला प्रोजेरिया नावाचा आजार झालेला असतो. चित्रपटात विद्या बालनने त्यांच्या आईची भूमिका साकारली होती. 

पृथ्वीराज कपूर- राज कपूर

चित्रपट- कल आज और कल

१९७१ मध्ये आलेल्या कल आज और कल या चित्रपटात पृथ्वीराज कपूर यांनी त्यांच्या मुलासोबत म्हणजे राज कपूरसोबत महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे पृथ्वीराज यांचा नातू आणि राज कपूर यांचा मुलगा रणधीर कपूर सुद्धा या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. हा पहिलाच असा चित्रपट होता ज्यात एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांनी एकत्र काम केले होते.