भारती सिंहने चक्क १५ किलो वजन घटविले! (Fat To F...
भारती सिंहने चक्क १५ किलो वजन घटविले! (Fat To Fit: Bharti Singh Opens Up On Her Weight Loss Journey)

हास्यकलाकार भारती सिंहचे कौशल्य सर्वांनाच परिचयाचे आहे. तिची विनोदबुद्धी आणि आत्मविश्वास तिला इतरांपेक्षा अलग ओळख देतात. स्वतःच्या लठ्ठपणावर आणि वजनावरून ती स्वतःच विनोद करत असते आणि या लठ्ठपणालाच तिने आपलं वैशिष्ट्य बनवलं आहे. परंतु आता भारती पहिल्यासारखी राहिली नसून ती आता फिट आणि स्लिमही झाली आहे. भारतीने स्वतःचे चक्क १५ किलो वजन कमी केले आहे. आधी ती ९१ किलो वजनाची होती, आता ७६ किलोची झाली आहे.

टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, वजन कमी झाल्यानंतर तिला स्वतःला अधिक चांगले, तंदुरुस्त आणि हलकं वाटत आहे. तिचा स्वतःवर विश्वास बसत नाहीये. तिने म्हटलंय की, वजन कमी झाल्यामुळे तिचा मधुमेह आणि अस्थमाही नियंत्रणात आला आहे. शिवाय तिला श्वास घेण्यास होणारा त्रासही आता राहिलेला नाही.

आपलं वजन कसं कमी झालं हे सांगताना ती म्हणाली की, ती इंटरमिटेंट फास्टिंग करत होती. म्हणजे ती संध्याकाळी ७ वाजल्यापासून सकाळी १२ वाजेपर्यंत काही न खाता राहते. भारती म्हणते, ‘जर तुम्ही स्वतःवर प्रेम केलं नाही तर, कुणी तुमच्यावर प्रेम करणार नाही.’
लॉकडाऊन दरम्यान आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकता आल्या, असं भारती म्हणाली. इतक्या वर्षात खा खा खाल्लं आणि तिच्या शरीराने ते स्वीकारलं. पण आता ७ वाजल्यानंतर तिचं शरीर जेवण देखील स्वीकारत नाही. भारती आपल्या बदललेल्या अवतारावर बेहद खूश आहे. आता तिला स्वतःला पडद्यावर पाहतानाही आनंद वाटतो. तिला स्वतःलाच सुंदर आणि तंदुरुस्त असल्याचा अनुभव येतोय. तिचा नवराही तिचे हे परिवर्तन पाहून खूश आहे. त्यामुळे भारतीला स्वतःचाच अभिमान वाटतो आहे.
तुम्ही देखील पाहता भारतीमधील परिवर्तनाचे फोटो…


