फॅशन आणि स्टाईलमध्ये वरचढ असलेल्या अभिनेत्रींच्...

फॅशन आणि स्टाईलमध्ये वरचढ असलेल्या अभिनेत्रींच्या मॉम्स्‌ (Fashionable Mothers Of Bollywood Actresses)

Fashionable Mothers Of Bollywood Actresses

बॉलिवूडच्या काही अभिनेत्री आपली फॅशन आणि स्टाईल यासाठी प्रख्यात आहेत. पण आश्चर्य म्हणजे, या अभिनेत्रींच्या माता याच फॅशनमध्ये त्यांच्यापेक्षा वरचढ आहेत. वय वाढलं, पण फॅशनेबल राहण्याचं त्यांचं आकर्षण कमी झालेलं नाही.

सारा अली खान – अमृता सिंह

Fashionable Mothers Of Bollywood Actresses

तरुण सारा अली खान प्रमाणेच वयस्कर झालेली अमृता सिंह फारच स्टायलिश जीवन जगते. अमृताने ऐंशीच्या दशकात आघाडीची अभिनेत्री म्हणून नाव कमावलं होतं. पण सैफ अली खानशी तिचं लग्न झालं. अन्‌ तिनं चित्रसृष्टी सोडली. दोन मुलांची आई झाल्यानंतर व ती मुले मोठी झाल्यानंतर अमृताने रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. फॅशनमध्ये ती साराशी जणू स्पर्धाच करते म्हणा ना.

आलिया फर्नीचरवाला – पूजा बेदी

Fashionable Mothers Of Bollywood Actresses

एके काळी आमीर खान सोबत काम केलेली पूजा बेदी आपल्या किशोरवयीन मुलीच्या आलिया फर्निचरवालाच्या खूपच निकट आहे. ‘जवानी जानेमन’ मधून आलियाने चित्रसृष्टीत पदार्पण केलं. आता पूजा व आलिया या दोघी मायलेकी ट्रेंडी व फॅशनेबल आहेत. त्यांचा ड्रेस सेन्स व स्टाईल बघाविशी वाटते.

उर्वशी रौतेला – मीरा सिंह

Fashionable Mothers Of Bollywood Actresses

उर्वशी ही मॉडेल व अभिनेत्री आहे. ती उत्तम डान्सर पण आहे. उर्वशी ब्युटी क्विन आहे. पण तिची आई मीरा सिंह तितकीच सुंदर आहे. उर्वशी तिची मोठी बहीण वाटते. आपलं सौंदर्य व आब मीरा राखून आहे. त्यामुळे ती मुलीसारखीच स्टायलिश व फॅशनेबल आहे. एका सौंदर्य स्पर्धेत मीराने, उर्वशी बरोबर परीक्षक म्हणून काम पाहिलं होतं.

ट्वींकल खन्ना- डिम्पल कापडिया

Fashionable Mothers Of Bollywood Actresses

डिम्पल कापडिया पूर्वी आणि आताही जेवढी सुंदर दिसते, तेवढीच तिची मुलगी ट्वींकल दिसते. डिम्पल अभिनयक्षेत्रात अजूनही दिसते. तर ट्वींकल आता लेखिका म्हणून नावाजली आहे. दोघीही चांगल्याच स्टायलिश व फॅशनेबल आहेत.

सोहा अली खान – शर्मिला टागोर

Fashionable Mothers Of Bollywood Actresses

राजघराण्यातील ही मायलेकींची जोडी दिमाखात असते. सौंदर्य आणि फॅशन यामध्ये दोघी आघाडीवर असतात. रॅम्प शो, लग्नसमारंभ किंवा ब्रॅन्ड एन्डॉर्समेन्टचा कार्यक्रम यामध्ये दोघी जोडीने जातात. अन्‌ दिमाखात वावरतात.

इशा देओल- हेमा मालिनी

Fashionable Mothers Of Bollywood Actresses

स्वप्नसुंदरी ही उपाधी लाभलेली हेमा मालिनी अद्यापही सुंदरच दिसते. इशा आणि अहाना अशा दोन तरुण मुलींची ती आई आहे. चार लोकात वावरताना स्टाईल आणि फॅशनमध्ये ती मागे हटत नाही. इश आणि अहानाला रुप आणि स्टाईल जणू वारसा हक्कानेच मिळाले आहे.

सोनाक्षी सिन्हा – पूनम सिन्हा

Fashionable Mothers Of Bollywood Actresses

शत्रुघ्न सिन्हाची मुलगी सोनाक्षी अगदी आपली आई पूनम हिच्या वळणावर गेली आहे. सोनाक्षीची फिल्मी कारकीर्द आणि स्वतःची स्टाईल पूनम कसोशीने सांभाळते.

रायमा, रिया सेन – मुनमुन सेन

Fashionable Mothers Of Bollywood Actresses

मुनमुन सेनच्या रायमा आणि रिया या दोन तरुण मुलींनी हिंदी आणि बंगाली चित्रपटांमधून बरीच कामे केली. मुनमुनचं वय झालंय्‌, असं वाटत नाही. म्हणूनच ती फॅशन आणि स्टाईलमध्ये आपल्या मुलींपेक्षा मागे नाही. पुढेच आहे.

5. करीना और करिश्मा कपूर- मां बबीता

Fashionable Mothers Of Bollywood Actresses

गुजरे ज़माने की मशहूर अभिनेत्री बबिता ने ऐसे समय में शादी की, जब वे अपने करियर के चरम पर थीं. शादी के बाद बबिता ने एक्टिंग को अलविदा कह दिया और अपने परिवार ने व्यस्त हो गईं. बबीता की दो खूबसूरत और टैलेंटेड बेटियां हैं- करिश्मा कपूर और करीना कपूर, जो अपने स्टाइल और शानदार एक्टिंग की वजह से बॉलीवुड में छाई रहती हैं. तीनों ही अपने समय की सक्सेसफुल, टैलेंटेड और ब्यूटीफुल एक्ट्रेसेस हैं.

9. कोंकणा सेन शर्मा- मां अपर्णा सेन

Fashionable Mothers Of Bollywood Actresses

कोकणा सेन को नेशनल अवॉर्ड प्राप्त करनेवाली निर्देशक उनकी मां अपर्णा सेन से ब्यूटी और टैलेंट विरासत में मिला है. दोनों हो ब्यूटी विद ब्रेन का परफेक्ट कॉम्बिनेशन है.