पंजाबी कुडी करिश्मा कपूरच्या पारंपरिक लूक्सवरुन...

पंजाबी कुडी करिश्मा कपूरच्या पारंपरिक लूक्सवरुन तुम्ही घेऊ शकता फॅशनचे धडे (Fashion Goals: Karisma Kapoor Looks Super Gorgeous In Desi Avatar, See Stunning Pictures)

९० च्या दशकात सर्वात स्टाइलिश अभिनेत्री म्हणून करिश्मा कपूरला ओळखले जायचे. सध्या ती बॉलिवूडपासून दूर असली तरी लाइम लाईटमध्ये नेहमीच असते. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करुन चाहत्यांना घायाळ करत असते.

करिश्माला लोलो या नावानेही ओळखले जाते. ती मॉर्डन लूकसोबतच पारंपरिक कपडे सुद्धा उत्तम कॅरी करते. आज आम्ही तुम्हाला करिश्माचे काही पारंपरिक लूक दाखवणार आहोत.

करिश्मा कपूर ही उत्तम अभिनेत्रीसोबतच एक उत्कृष्ट डान्सर सुद्धा आहे. करिश्मा जेव्हा मलायका अरोरा, अमृता अरोरो, करीना कपूर सोबत बाहेर फिरायला जाते तेव्हा ती या सगळ्यांमध्ये उठून दिसते. कारण अनेकदा सेलिब्रेटींच्या कपड्यांवरुन त्यांना ट्रोल केले जाते.

पण करिश्मा कपूरचे तिच्या कपड्यांवरुन नेहमीच कौतुक होते. व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये सुद्धा करिश्मा खूप सुंदर दिसते, ती कपडे पण खूप छान घालते अशा तिच्या चाहत्यांच्या कमेंट पाहायला मिळतात.