फरहान आणि शिबानीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियाव...

फरहान आणि शिबानीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Farhan-Shibani Wedding Album: Farhan Akhtar And Shibani Dandekar Share Dreamy Wedding Pics)

बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर १९ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले. शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या खंडाळ्यातील एका फार्म हाऊसवर फरहान आणि शिबानी यांचा लग्नसोहळा पार पडला.

फरहान अख्तर आणि शिबानी यांचं लग्न सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला दोघांनीही रजिस्टर मॅरेज केलं होतं. विशेष म्हणजे शिबानी आणि फरहान यांनी निकाह न करता किंवा सप्तपदी न घेता हटके पद्धतीने लग्न केलं. शिबानी आणि फरहाननं Vow ( शपथ किंवा वचन) आणि रिंग सेरेमनी करत एकमेकांसोबत जीवन व्यतित करण्याचा निर्णय घेतला.

दोघांनीही अत्यंत साध्या पद्धतीनं आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. शिबानी आणि फरहान यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.

शिबानीने लग्नासाठी लाल रंगाचा वेडिंग गाऊन परिधान केला होता. तर फरहान अख्तरनं काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. अत्यंत साधा मेकअप करुनदेखील शिबानीचा लूक अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

शिबानीच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती.

फरहान आणि शिबानीच्या लग्नातील खास क्षण…

मागच्या काही वर्षांपासून शिबानी आणि फरहान एकमेकांना डेट करत होते. ‘आय कॅन डू इट’ टीव्ही शोच्या सेटवर पहिल्यांदा भेटले. नंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. अनेकदा त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करुन प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती.

लग्नसमारंभातील खास फोटो…

फरहान आणि शिबानीवर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

( फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)