EXCLUSIVE! फरहान अख्तर – शिबानी दांडेकर म...

EXCLUSIVE! फरहान अख्तर – शिबानी दांडेकर मराठी रितीरिवाजा नुसार लग्न करणार (Farhan Akhtar And Shibani Dandekar Will Have Maharashtrian Wedding On 19th Feb)

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचे होणार, होणार म्हणून गाजत असलेले लग्न अखेरीस परवा – १९ फेब्रुवारीला होईल, मिळालेल्या माहितीनुसार हे कोर्ट मॅरेज असेल. विशेष म्हणजे या कायदेशीर विधी आधी, त्यांचे महाराष्ट्रीयन विधींप्रमाणे लग्न लागणार आहे.

हे लग्न अगदीच खासगी असल्याने निवडक नातेवाईक व मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत पार पडेल. जावेद अख्तर यांच्या खंडाळा येथील ‘सुकून’ या फार्म हाऊसवर हे विधी करण्यात येतील.
लग्नाची, विधींची सर्व तयारी झाली असून फरहान अख्तरयाबाबत अतिशय गुप्तता बाळगून आहेत. प्रसिद्धी माध्यमांना ते दूर ठेऊ पाहत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आज रात्री दांडेकर भगिनी आपल्या निकटवर्तीयांसोबत बॅचलरेट पार्टी करणार आहेत. तर उद्या लग्नाआधीचे विधी बहुधा सीमांत पूजन वगैरे – होण्याची दाट शक्यता आहे.

फरहान आणि शिबानी गेल्या ४ वर्षांपासून ‘डेट’ करत आहेत. आधी लपूनछपून असलेले हे प्रेमप्रकरण यांनी २०१८ साली उघड केले. त्यानंतर दोघेही सोशल मिडीयावर आपले फोटो प्रसिद्ध करून प्रेमाची ग्वाही देत राहिले.